बिग बझार झाला रिलायन्सच्या मालकीचा


नवी दिल्ली– मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडने फ्यूचर ग्रुपचा रिटेल, होलसेल लॉजिस्टिक्स आणि गोदाम व्यवसाय 24 हजार 713 कोटींना खरेदी केला आहे. त्यामुळे ‘सबसे सस्ता, सबसे अच्छा’, या टॅगलाईन ओळख बनलेले बिग बझार रिलायन्स समूहाचे झाले आहे.

भारतीय ई-कॉमर्स मार्केटमध्ये अमेझॉनसारख्या (Amazon)  दिग्गजांशी स्पर्धा करण्यासाठी रिलायन्स रिटेल आपले पाय बळकट करत आहे.

कराराचा भाग म्हणून, फ्यूचर ग्रुप काही कंपन्यांना फ्यूचर एंटरप्राइजेज लिमिटेड (FEL) मध्ये विलीन करीत आहे. या योजनेंतर्गत रिटेल आणि घाऊक उद्यम रिलायन्स रिटेल आणि फॅशन लाइफस्टाईल लिमिटेड (RRFLL)  कडे वर्ग करण्यात येत आहेत. ही आरआरव्हीएलची (RRVL) संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे; रसद व गोदाम उपक्रम आरआरव्हीएलकडे वर्ग करण्यात येत आहेत.

अधिक वाचा  सिल्व्हर लेक करणार रिलायन्स रिटेलमध्ये 7 हजार 500 कोटींची गुंतवणूक

कंपनीने याबाबत पत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली. त्यानुसार बिग बझार, ईझीडे आणि FBB च्या देशातील ४२० शहरांमध्ये पसरलेल्या १८०० हून अधिक स्टोअर रिलायन्सच्या मालकीचे होतील. फ्यूचर ग्रुप आणि रिलायन्सने २४ हजार ७१३ कोटींच्या डीलवर शिक्कामोर्तब झाले आहे. यापुढे फ्यूचर समूहाचा रिटेल आणि घाऊक व्यवसाय रिलायन्स रिटेल आणि फॅशन लाइफस्टाईल लिमिटेड (RRFLL) अंतर्गत येईल.RRFLLच्या विलिनीकरणानंतर आरआरएफएलएल फ्यूचर एंटरप्राइजेस लिमिटेडमध्येही गुंतवणूक करेल. रिलायन्स १२०० कोटींची प्रेफरेंन्शियल इश्युद्वारे गुंतवणूक करेल आणि फ्यूचर एन्टरप्रायजेस लिमिटेडमधील ६.०९ टक्के हिस्सा खरेदी करेल. यासंदर्भात रिलायन्स रिटेलच्या संचालिका ईशा अंबानी यांनी डीलनंतर माहिती दिली. छोट्या व्यापाऱ्यांसह सक्रिय सहकार्याच्या अनोख्या मॉडेलने रिटेल उद्योगाच्या विकासाची गती सुरू ठेवू, अशी आम्हाला आशा आहे.

अधिक वाचा  रिलायन्स रिटेलमध्ये केकेआरची ₹ 5,550 कोटींची गुंतवणूक :सिल्व्हर लेकनंतर रिलायन्स रिटेलमधील ही दुसरी मोठी गुंतवणूक KKR invests ₹ 5,550 crore in Reliance Retail

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी किरकोळ व्यवसायात 3 कोटी किराणा मालक आणि 12 कोटी शेतकरी जोडण्याचे लक्ष्य केले होते. रिलायन्स फ्यूचर समूहाचा रिटेल, घाऊक व पुरवठा साखळी व्यवसाय मिळवून आपले स्थान मजबूत करीत आहे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love