Bhide Wada Demolished – महात्मा फुले (Mahatma Phule) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी पुण्यातील ज्या वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा (First Girls School) सुरू केली तो भिडे वाडा (Bhide Wada) सोमवारी रात्री सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाने पुणे महापालिकेने (pmc) जमीनदोस्त (Demolished) केला. आता या जागी २००६ पासून रखडलेलं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक (monument) लवकरच उभारलं जाणार आहे.
क्रांतीसूर्य महात्मा फुले (Mahatma Phule) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी देशातील पहिली मुलींची शाळा शहरातील बुधवार पेठ (Budhwar Peth) येथील तात्याराव भिडे वाड्यामध्ये (Tatyarao Bhide Wada) सुरू केली होती. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचे काम २००६ पासून रखडले आहे. भिडे वाड्याची मालकी एका सहकारी बँकेकडे आली होती. या बँकेच्या चोवीस भाडेकरूंनी या प्रकरणी पालिकेविरोधात खटला दाखल केला होता. उच्च न्यायालयात या प्रकरणी ८० वेळा सुनावणी होऊन गेल्याच महिन्यात पुणे महापालिकेच्या बाजूने निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्व भाडेकरूंची याचिका फेटाळून लावली आणि भिडे वाडा पालिकेला ताब्यात देण्याचा निर्णय दिला. त्यानुसार सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास पुणे महापालिकेचे विविध कार्यालयातील ५० बिगारी यांनी वाडा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही मोहिम रातोरात फत्ते केली गेली. आता या जागी राष्ट्रीय दर्जाचं स्मारक लवकरच उभारलं जाईल.
भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक करण्याचा ठराव पुणे महापालिकेत झाला होता. मात्र, त्याविरोधात गेलेल्या याचिकाकर्त्यांमुळे १३ वर्षे या स्मारकासाठी न्यायालयीन संघर्ष करावा लागला. भिडेवाडा पालिकेकडे हस्तांतरित करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतरी या निकाला विरोधात भाडेकरूनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, या वाड्याबाबत पालिकेने सर्वोच्च न्यायालयात अगोदरच कॅव्हेट दाखल केली आहे. या संदर्भात सुनावणी झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने भिडे वाडा संदर्भातील याचिका फेटाळली आणि नाराजी व्यक्त करून याचिकाकर्त्यांना तुम्हाला दंड का करू नये, असा प्रश्न केला. एका महिन्यात भिडेवाडा रिकामा करून महापालिकेकडे हस्तांतरित करा, असा आदेश दिला. तसेच असे न केल्यास महापालिका जबरदस्तीने भूसंपादन करेल, असा इशाराही देण्यात आला होता.
पुन्हा होणार विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या भिडेवाड्याचे आता राष्ट्रीय स्मारक होण्याचा शेवटचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा भिडे वाड्यात विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा सुरु होणार आहे.