इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यातील एकाला अटक

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे– राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयएन) इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यातील कोंढवा भागातील तल्हा खान नावाच्या ३८ वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा टाकल्याची घटना समोर आली आहे. तल्हा खान याला कोथरूड येथून अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मागील वर्षी अटक करण्यात आलेल्या आयसिससाठी काम करणाऱ्या जोडप्यासोबत तल्हा खान संपर्कात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सोमवारी सकाळी १०  वाजता तल्हा खानच्या घरी दिल्लीहून एनआयएचे अधिकारी आले होते. तब्बल ८  तास तल्हा खानची चौकशी करण्यात आली. या चौकशीत एनआयएच्या अधिकाऱ्यांनी खान याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले आहे.तल्हा खान इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता आणि या संघटनेची विचारधारा पसरवण्याचे काम करत होता असा संशय एनआयएला आहे. तल्हा खान याच्या घरावर छापा टाकल्यानंतर तसेच घराची झाडाझडती घेतल्यानंतर डिजिटल साहित्य जप्त करण्यात आले आहे. सादिया अन्वर शेख आणि नबील सिद्दीकी खत्री यांना जुलै २०२० मध्ये एनआयएने अटक केली होती. तल्हा खान हा नबील सिद्दीकी खत्रीच्या संपर्कात असल्याचं एनआयएला तपासात आढळून आल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

या प्रकरणात जहानझीब वानी आणि त्याची बायको हिना बशीर बेग या काश्मिरी दाम्पत्याला मार्च २०२० मध्ये अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीत लोधी कॉलनी पोलीस ठाण्यात ८ मार्च २०२० रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आला होता. त्यानंतर एनआयएने २० मार्च २०२० रोजी या प्रकरणाची पुन्हा नोंद केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अब्दुल्ला बसीत, सादिया अन्वर शेख, नबील सिद्दीकी खत्री आणि अब्दुल रहमान या चौघांना अटक करण्यात आली होती.

भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबाया प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून ईसीसची विचारसरणी पसरवण्याचा कट रचणे,  ईसीस साठी काम करण्यासाठी सेल स्थापन करणे, निधी उभारणे, शस्त्रे गोळा करणे, आयईडी बनवणे आणि टार्गेट करुन हत्या करणे, यांसारखे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *