मुंबई कॉंग्रसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची वर्णी


मुंबई – मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे भाई जगताप (अशोक अर्जुनराव जगताप) Bhai Jagtap (Ashok Arjunrao Jagtap) has become the President of the Mumbai Congressयांची वर्णी लागली आहे. तर कार्याध्यक्षपदी चरणसिंह सप्रा Charan Singh Sapra as working president यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या दोघांच्या नावाला मंजुरी दिली आहे.

मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजी असल्याने अध्यक्षपदाची चर्चा सुरु होती. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक जणांची लॉबिंग सुरु होते. वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, अस्लम शेख यांचा समावेश होता.

अधिक वाचा  भाजपची प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर; पडळकर आणि महाडिक यांना पक्षाकडून मोठ्या पदाचे 'गिफ्ट'

दरम्यान, इतर इच्छुकांनाही काहीना काही पदं देण्यात आली आहेत. यांपैकी मोहम्मद आरिफ नसिम खान (प्रचार समितीचे, अध्यक्ष), डॉ. अमरजितसिंह मनहास (समन्वय समिती, अध्यक्ष), सुरेश शेट्टी (जाहीरनामा आणि प्रकाशन समिती, अध्यक्ष), चंद्रकांत हंडोरे (मुंबईचे प्रभारी), गणेश यादव (तपासणी आणि रणनीती समिती, सचिव), प्रिया दत्त, अमिन पटेल, जनेत डिसुझा, उपेंद्र दोशी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love