कुटुंबीयांकडून प्रेमसंबंधाला विरोध होण्याच्या भीतीने प्रेमी युगुलाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न


पुणे – कुटुंबीयांकडून प्रेमसंबंधाला विरोध होण्याच्या भीतीने प्रेमी युगुलाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला असून, तरुण मात्र वाचला आहे. उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणीच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची मुलगी एका कंपनीत कामाला होती. त्या ठिकाणी तिचे एका तरुणासोबत प्रेम संबंध निर्माण झाले. कालांतराने या तरुणाने नोकरी सोडून दुसरीकडे कामाला लागला. तरीही त्यांच्यात प्रेम कायम होते. परंतु घरच्यांकडून आपल्या प्रेम संबंधाला विरोध होईल अशी भीती त्या तरुणाच्या मनात होती. त्यामुळे 4 डिसेंबर रोजी दोघांनी एकत्र मिळून विष प्राशन केले. दरम्यान, त्रास होऊ लागल्यामुळे संबंधित तरुणाने आपल्या नातेवाईकांना याची माहिती. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही रुग्णालयात दाखल केले.

अधिक वाचा  #हीट अँड रन प्रकरण : ‘ब्लड सॅम्पल’मध्ये फेरफार करण्यासाठी वडगाव शेरीतून आले ३ लाख रुपये : दोन डॉक्टरांसहित तिघांना ३० मे पर्यंत पोलिस कोठडी

दरम्यान, तरुणीच्या अंगात जास्त प्रमाणात विष भिनल्यामुळे ती अत्यवस्थ होती. तर तीन दिवसांच्या उपचारानंतर तरुणाची तब्येत बरी झाली. त्यानंतर या तरुणीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 14 डिसेंबरच्या रात्री तिचा मृत्यू झाला. तरुणीच्या वडिलांनी पोलीस स्टेशन गाठत तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love