रवीन्द्र वैद्य व स्मिता घैसास यांची MSME Board वर नियुक्ती ..


औरंगाबाद: केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत MSME Board वर महाराष्ट्रातून प्रसिध्द उदयोजक रवीन्द्र वैद्य (औरंगाबाद) व स्मिता घैसास (पुणे)यांची नियुक्ति करण्यात आली आहे. रवीन्द्र वैद्य हे श्री गणेश प्रेस एंड कोट प्रा.लीचे व्यवस्थापकीय संचालक  तर स्मिता घैसास या मे.मिनीलेक ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. उदयोगक्षेत्रात दोघांचेही विशेष नाव असून अनेक सामाजिक संघटनेत योगदानही आहे.

सध्या रवींद्र वैद्य लघुउद्योग भारती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तर स्मिता घैसास या अ.भा.लघु उद्योग भारतीच्या उपाध्यक्ष आहेत.महाराष्ट्रातील उदयोजकांच्या अनेक समस्या या नियुक्तिमुळे केंद्र सरकार पर्यंत पोहोचतील असा विश्वास अनेक उदयोजकांनी व्यक्त केला आहे.व संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक उदयोजकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अधिक वाचा  येत्या ४ ते ५ वर्षांत देशातील ‘सीएनजी स्टेशन्स’ची संख्या ३ हजारांवरून १० हजारांपर्यंत करणार -धर्मेंद्र प्रधान

तसेच महात्मा गांधी इन्स्टीट्यूट फॉर रूरल ईंडस्ट्रीयलायझेशन  (MGIRI)या केंद्र सरकारच्या संस्थेवर महाराष्ट्रातील वर्धा येथील उदयोजक श्री शशि भूषण वैद्य यांची नियुक्ति करण्यात आली आहे ते सध्या अ.  भा.  लघुउद्योग भारतीचे उपाध्यक्ष आहेत

त्याचप्रमाणे औरंगाबाद येथील उदयोजक दुष्यंत आठवले यांची केंद्र सरकार MSME अंतर्गत एससी-एसटी मॉनीटरींग समितिच्या सदस्यपदी नियुक्ति करणयात आली आहे.

सर्वांचे महाराष्ट्रातील लघुउद्योग भारती सदस्य व अनेक उदयोजकांनी अभिनंदन केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love