‘दगडूशेठ’ गणपती मंदिराची थायलंड मध्ये हुबेहूब प्रतिकृती 

An exact replica of 'Dagdusheth' Ganpati Temple in Thailand
An exact replica of 'Dagdusheth' Ganpati Temple in Thailand

पुणे : लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीची ख्याती भारतातच नव्हे तर जगभरात आहे. जगभरात विविध ठिकाणी दगडूशेठ गणपतीच्या प्रतिकृतीचे पूजन करून गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, आता चक्क थायलंड मधील फुकेत येथे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरासारखे हुबेहूब भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. (An exact replica of ‘Dagdusheth’ Ganpati Temple in Thailand)

थायलंडमधील फुकेत येथील रहिवासी पापाचसॉर्न मिपा यांच्या पुढाकाराने या मंदिराची प्रतिकृती तेथे साकारण्यात येत आहे. या मंदिराच्या छायाचित्राच्या फ्रेम चे अनावरण नुकतेच पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, अमर कोद्रे, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, विलास रासकर यांसह विश्वस्त व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  मनसे ताकदीने मोहोळ यांचा प्रचार करणार : मनसे नेते अमित ठाकरे यांचा विश्वास

पापाचसॉर्न मिपा या साध्या पत्र्याच्या घरात वास्तव्यास होत्या. मात्र, गणरायाच्या कृपेने आज त्यांची फुकेत मधील यशस्वी उद्योजिका म्हणून ओळख आहे. फुकेत ९ रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी ही त्यांची कंपनी आहे. गणरायाच्या कृपेने त्यांना यश मिळाल्याने त्या फुकेत येथे बाप्पाचे मंदिर उभारत आहेत. बांधकाम क्षेत्रात त्यांना मिळालेले यश हे दगडूशेठ गणेशामुळेच मिळाले, असल्याची भावना त्यांनी पुण्यात व्यक्त केली. थायलंडहून अनेकांना पुण्यात दर्शनासाठी येण्याची इच्छा आहे, मात्र अंतर खूप असल्याने शक्य होत नाही. याकरिता मी फुकेत येथे मंदिर उभारत आहे, असे त्यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love