‘कसे आहात?’ एवढे शब्दही ज्येष्ठांसाठी टॉनिक : वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे

पुणे-मुंबई
Spread the love

पिंपरी(प्रतिनिधी)-ज्येष्ठांच्या मुख्य तक्रारी मुख्यत्वे कुटुंबातील लोकांबद्दलच असतात. ‘कसे आहात’ एवढे शब्दही ज्येष्ठांसाठी टॉनिक आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी केले.

जुनी सांगवीतील पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सुनील टोनपे यांच्या हस्ते झाले. यावेळी अनिता शितोळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अरुण बागडे, शहर कार्याध्यक्षा वृषाली मरळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी अशोक चव्हाण, प्रकाश देशमुख, ईश्वरलाल चौधरी, संभाजी मनोकर, चंद्रकांत चोपडे, माजी नगरसेविका चंदा लोखंडे, राजू लोखंडे, महेश भागवत, शाम जगताप, तानाजी जवळकर, उज्ज्वला ढोरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे म्हणाले, की निसर्ग थांबत नाही. प्रत्येकाला ज्येष्ठ व्हायचेच आहे. त्यामुळे समाजात ज्येष्ठांसाठी आनंद निर्मिती झाली पाहिजे. ‘त्यांची पैशाची माफक अपेक्षा असते, पण घरातील लोकांनी थोडा ढिला हात ठेवून ज्येष्ठांना खर्चासाठी पैसे दिले पाहिजेत.

अतुल शितोळे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या उभारणीमागील संकल्पना स्पष्ट करताना सांगितले, की ज्येष्ठ नागरिकांना आपली सुख-दुःखे मांडता यावीत, या उद्देशाने माजी महापौर स्व. नानासाहेब शितोळे यांनी या ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. ज्येष्ठाना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.

 आरती राव म्हणाल्या, की ज्येष्ठांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत, काहीतरी क्रिएटिव्ह करीत आनंदाने जीवन जगायचे आहे. कारण समाजाला ज्येष्ठ नागरिकांची खूप गरज आहे.

 अरुण पवार यांनी सांगितले, की सामाजिक कार्याला राजकारणाची जोड देऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी स्तुत्य कार्य केले जात आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. धार्मिक, पर्यावरण विषयक कार्यात जेष्ठांनी कार्यरत राहिल्यास मन रममाण होईल.

अरुण बागडे म्हणाले, की प. सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ हा पिंपरी चिंचवड शहरातील आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ आहे. या ज्येष्ठ नागरिकांचे मोठे काम आहे. त्यांच्यासाठी वैचारिक मेजवानीचे केलेले आयोजन स्तुत्य आहे.

राजू लोखंडे, वृषाली मरळ, तानाजी जवळकर, विष्णू शेळके यांनीही आपले विचार व्यक्त केले.

दरम्यान, आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. दिलीप गरुड यांचे व्याख्यान, सांघिक खेळ, ह भ प बंडोपंत शेळके महाराज यांचे प्रवचन, विजय देशमुख यांचे प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्राची संपत्ती या विषयावर व्याख्यान, डॉ. सुलभा मोहिते यांचे ज्येष्ठ नागरिक घरातील अडचण आवश्यकता या विषयावर व्याख्यान आदी कार्यक्रम संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन नीलम मेमाणे व स्मिता बर्गे यांनी केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *