अखिल पद्मशाली समाज अन्नछत्र श्रीशैलम येथे स्वातंत्र्यदिन सोहळा संपन्न

अखिल भारत पद्मशाली धर्मशाळा अन्नछत्रम
अखिल भारत पद्मशाली धर्मशाळा अन्नछत्रम

श्री रविकुमार (श्रीशैलम) हैदराबाद /अरुण अमृतवाड पुणे- श्रीशैलम क्षेत्र येथील अखिल भारत पद्मशाली धर्मशाळा अन्नछत्रम नित्यानदान सतरामच्या प्रांगणात ७७ वा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करण्यात आला. धर्मशाळेचे अध्यक्ष वर्कला सूर्यनारायण यांच्या हस्ते व अखिल भारत पद्मशाळी धर्मशाळा श्रीक्षेत्र पंढरपूरचे कार्यकारणी सदस्य अरुण अमृतवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एस. आर, ट्रॅव्हल्स दिव्यश यात्राचे श्री.नागार्जुन चिलवेरी व सौ. मेघा चिंतल उपस्थित होते.
संगीत धर्मशाळेतील भाविक व कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. नंतर अध्यक्ष वर्कला सूर्यनारायण यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या महापुरुषांनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब करून देशाला कीर्ती व प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आवाहन युवकांना केले.

अधिक वाचा  आदिवासी विद्यार्थी शासकीय वसतीगृहामध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न केल्याने अभाविपचे आंदोलन


अरुण अमृतवाड यांनी आपल्या भाषणात 15 ऑगस्ट व 26 जानेवारी निमित्त अशाच प्रकारचे एकत्रित येऊन राष्ट्रध्वज फडकवण्यात यावे व आपली एकजूट दाखवावी असे आवाहन केले. पद्मशाली धर्मशाळा येथे झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होताना महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील भाविकांनी आनंद व्यक्त केला.
अन्नछत्रचे कार्याध्यक्ष कर्नाटकी श्रीधर, उपाध्यक्ष गोशिका यादगिरी, गंजी रवींद्रनाथ, सरचिटणीस जीरापू चंद्रशेखर, पुनन्ना श्रीनिवास, खजिनदार रविराला वीरैया, सचिव एले यदाय्या, रुद्र महालक्ष्मी, कार्यालय सचिव तुम्मा सत्यनाराया, चिनीराम चंदरायाना, चिटणीस चन्द्रशेखर, सचिव एले यदाय्या, सदस्य चंदनाराया, सदस्य रामुलु., डॉल रामुलु, आदी धर्म शाळेचे विश्वस्त मान्यवर उपस्थित होते.
श्रीशैलम यात्रेनिमित्त पुण्याहून आलेले सर्व यात्रेकरू सहभागी झाले विविध राज्यांतील भाविक व कर्मचारी तसेच समृद्धी इंटरप्राईजेस अंतर्गत एस. आर. ट्रॅव्हल्स व दिव्यांश यात्र यात्रेकरू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love