धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया


पुणे- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केल्यानंतर त्याचे पडसाद राजकीय पटलावर उमटले आहेत. धनंजय मुंडे यांनी नैतिक मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिज अशी मागणी करीत भाजपने त्यांच्या विरुद्ध आंदोलन सुरु केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पवार यांनी, मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने, पक्षाला त्याचा विचार करावा लागेल असे वक्तव्य केले होते मात्र, नंतर त्यांनी घुमजाव करत याप्रकरणी संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच निष्कर्ष काढणे योग्य ठरेल असे म्हटल्याने त्याच्या प्रतिक्रियाही राजकीय क्षेत्रात उमटल्या. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी धनंजय मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंयज मुंडे यांच्यावर अत्याचाराच्या झालेल्या आरोपांची चौकशी सुरू आहे. ज्या महिलेने हे आरोप केले त्या महिलेवर भाजप, मनसेच्या नेत्यांबरोबरच विमानसेवा कंपनीतीन अधिकाऱ्याने देखील आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील सत्यता पडताळूनच पुढील निर्णय घेण्यात येतील. हे पक्षाचे नेते शरद पवार यांनी सांगितले आहे, त्यामुळे या प्रकरणात पवार साहेब जो निर्णय घेतील तो अंतिम असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंयज मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत स्पष्ट केले. बारामती येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

अधिक वाचा  महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा -अजित पवार

तर नामांतराच्या मुद्द्यावर आमच्यात मतमतांतरे आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर एकत्र बसून मार्ग काढण्यात येईल. महाविकास आघाडी सरकारमध्ये जो कमान समान कार्यक्रम ठरला आहे. त्यानुसारच निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी पवार यांनी सांगितले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love