'All India Mushaira' under Pune Festival 2023

३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्वमध्ये सांस्कृतिक मेजवानी

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे दि २२ ते २७ सप्टेंबर या काळात रसिक प्रेक्षकांना जणू सांस्कृतिक मेजवानीच मिळणार आहे. कथ्थक, नृत्य, इंद्रधनू, केरळ महोत्सव, मराठी कवी संमेलन, हिंदी-मराठी गाणी, अभंग, गझल, सुफी संगीत, लावणी, व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिव्हल अशा मनोहारी कार्यक्रमांची रेलचेल पुणेकरांना अनुभवायला मिळेल. हे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य आहेत. अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल व मुख्य समन्वयक अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी बालगंधर्व रंगमंदिर येथील पुणे फेस्टिव्हल सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख अतुल गोंजारी व संयोजक मोहन टिल्लू व श्रीकांत कांबळे उपस्थित होते. (A cultural feast at Balgandharva under the 35th Pune Festival) पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी गेल्या ३५ वर्षात प्रत्येकवेळी महाराष्ट्रातील कलावंतांन समवेतच देशातील परराज्यातील कलावंत देखील नेहमी आमंत्रित केले. त्यामुळे, राष्ट्रीय – आंतर राष्ट्रीय कीर्तीचे कलावंत बघण्याची व ऐकण्याची संधी पुणेकरांना लाभली. या प्रमाणेच राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलमध्ये केरळ महोत्सव, बंगाल महोत्सव, कोल्हापूर महोत्सव या प्रमाणेच जम्मू काश्मीर व ईशान्य भारतातील पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार पुणे फेस्टिव्हलमध्ये सादर केले. ही महत्वाची बाब मानली पाहिजे असे ते म्हणाले.

शनिवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वा बालगंधर्व कलादालन येथे महिला महोत्सवाचे उद्घाटन पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री व नृत्यांगना खा. हेमा मालिनी करणार आहेत. तसेच हेमा मालिनी यांच्यावर महिला चित्रकारांनी रंगवलेल्या पेंटिंग्ज प्रदर्शनाचे उद्घाटनही त्या या प्रसंगी करणार आहेत.  हे पेंटिंग्ज एक्सिबिशन दि.  २३, २४ व २५ सप्टेंबर या काळात सकाळी १०.०० ते रात्री ८.०० यावेळेत विनामुल्य खुले असेल.

बालगंधर्व रंगमंदिरमध्ये दि. २३ सप्टेंबर रोजी दु. १२.०० ते ३.०० या वेळेत आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भोपाळच्या कथ्थक नृत्यांगना व्ही. अनुराधा सिंह आणि जबलपूरच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कथ्थक नृत्यांगना निलांगिनी कलंत्रे यांच्या कथ्थक नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे.

याच दिवशी सायं. ५.०० वा. १८ ते २८ वर्षे वयोगटातील तरुण कलावंतांचा ‘इंद्रधनू’ कार्यक्रम सादर होईल. यामध्ये कथ्थक, भरतनाट्यम, कुचीपुडी, ओडिसी, पाश्चात्य नृत्य, शास्त्रीय गायन, भक्तीगीते, वाद्य संगीत, चित्रपटगीते, नाट्यगीते, पोवाडे, गायन असे विविध कलाप्रकार उदयोन्मुख व नवोदित कलाकारांकडून सादर केले जातील. याचे संयोजन रविंद्र दुर्वे यांनी केले आहे.

रविवार, दि. २४ सप्टेंबर रोजी  दु. १२.०० ते ४.०० या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात २६ ते ३६ व ३७ ते ५० वर्ष असे दोन वयोगट असणार आहेत. विवाहित महिलांच्या कलागुणांना  वाव देणाऱ्या  या स्पर्धेस महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. याचे संयोजन अॅड. अमृता जगधने यांनी केले आहे.

याच दिवशी सायं. ५. ००  ते रात्री १२. ०० या वेळेत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही केरळ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात ४.५ लाख केरळवासीय राहत असून त्यांच्या 32 संस्थांच्या पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर आणि कॉ-ऑर्डिनेटर बाबू नायर यांनी याचे आयोजन केले आहे. पुण्यातील केरळचे कलावंत अनेक शास्त्रीय नृत्याविष्कार सादर करतील.

सोमवार , दि. २५ सप्टेंबर रोजी दु. १२. ०० वा महिला नृत्य स्पर्धा आयोजित केल्या असून यामध्ये  १८ ते ३५ वर्षे आणि ३६ ते ५० वर्षे  अशा २ वयोगटात ३ मिनिटाच्या एकल नृत्य स्पर्धा आणि १८ ते ५० वर्ष वयोगटात जास्तीत जास्त १० महिला स्पर्धकांचा समावेश असणाऱ्या ५ मिनिटांची समूह नृत्य स्पर्धा पार पडतील. फ्युजन बॉलीवूड, कथ्थक, ओडिसी, कथकली, लावणी, लोकगीतांवर आधारित नृत्ये यांमध्ये सादर होतील.

दि. २५ सप्टेंबर रोजीचं सायंकाळी ५. ०० वा. व्हाईस ऑफ पुणे सॉंग कोम्पिडीशन आयोजित केली असून यामध्ये १८ ते ४० वर्षे आणि ४० वर्षावरील स्त्री पुरुषांसाठी हिंदी सुगम स्पर्धा आयोजित केलेली आहे. यातून स्त्री व पुरुष गटातून प्रत्येकी एक प्रथम क्रमांकाचे गायक व गायिका  निवडले जातील . पुण्यातील विविध महाविद्यालयांनी यात भाग घेतला असून यंदापासून प्रथमच ‘पुणे फेस्टिव्हल फिरता करंडक’ दिला जाणार आहे. अॅड. अनुराधा भारती यांनी याचे संयोजन केले आहे.

याच दिवशी रात्री ९.०० वा. ‘हास्यधारा’ हे मराठी कवी संमेलन आयोजित होईल. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे याचे सूत्रसंचालन करतील. यामध्ये अशोक नायगावकर, महेश केळुसकर, संदीप खरे, वैभव जोशी, नीलम माणगावे, अंजली कुलकर्णी, हर्षदा सुंठणकर, प्रशांत केंदळे व इतर मान्यवर कवी असणार आहेत.

मंगळवार दि २६ सप्टेंबर रोजी दु १२. ०० वा. लावणीचा खणखणाट व घुंगरांचा चणचणाट हा लावणी कार्यक्रम कविता प्रोडक्शनचे कविता बंड व पप्पू बंड सादर करतील. यामध्ये , रील स्टार सोनाली गायकवाड , रील स्टार चित्रा, दिव्या कदम , डान्सर स्वप्ना, डान्सर राधिका यांचा सहभाग आहे. २ कोरस डान्सर सोबत ५ महिला  आणि  २ पुरुष डान्सरही असतील. तसेच, पुरुष व महिला गायक देखील असतील. तसेच, एक निवेदक असतील. बैठकीची लावणी, आयटम सॉंग हे याचे मुख्य आकर्षण आहे.

याच दिवशी सायंकाळी ५. वा. ‘पी से पंचम आर. डी. बर्मन लाईव्ह’ हा ऑर्केस्ट्रा हर्ट्झ म्युझिकच्या प्रख्यात गायिका श्रद्धा गायकवाड सादर करणार आहेत. यामध्ये गायिका   श्रद्धा गायकवाड,सूर्या शिवरामन,लीना काळे,श्रद्धा कांबळे, भाविका कुलकर्णी,अनुपमा कुलकर्णी आणि गायक प्रशांत साळवी , उमेश कुलकर्णी, अद्वैत लेले, हिमांशू जयस्वाल, निखील देशपांडे हे आर. डी. बर्मन यांनी गायलेली व संगीत दिलेली लोकप्रिय गाणी सादर करणार आहेत. अमन सय्यद (synthesizer), ऋतुराज कोरे (ऑक्टोपॅड, रीदम मशीन), हार्दिक रावल (लीड गीटार), लिजेश शशिधरन (बेस गिटार),श्रीपाद सोलापूरकर (Saxophone) , नितीन शिंदे (तबला, ढोलक),आयुष शेखर (ड्रम) हे वाद्यसंगत करतील.

रात्री ९.०० वा. प्रख्यात साई भजन गायक रविराज नासेरी अभंग , गझल, सुफी गाणी ,  जुनी हिंदी गाणी  सादर करणार आहेत. संपूर्ण भारतात व देशाबाहेरही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत.

बुधवार दि. २७ सप्टेंबर रोजी दु १२.०० ते ४.०० यावेळेत महिला महोत्सवातील नववधू मेकअप स्पर्धा होणार असून दिपाली पांढरे यांनी याचे संयोजन केले आहे.

यानंतर रात्री ९ .०० वा प्रख्यात गायक जितेंद्र भूरुक सहकाऱ्यांसमवेत ‘प्यार का मौसम’ हा मधुर रोमँटिक हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करतील. यामध्ये जितेंद्र भुरुक, अश्विनी वझे, अश्विनी कुरपे, आकाश सोळंकी हे गायक सहभागी असतील. हिंदी व मराठी चित्रपटातील रोमँटिक मधुर गीते ते सादर करतील.

बालगंधर्व रंगमंदिर सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख अतुल गोंजारी, असून  बालगंधर्व रंगमंदिर व कलादालनाची पुणे फेस्टिव्हल संयोजक मोहन टिल्लू  व श्रीकांत कांबळे आहेत.

३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प लि. आणि  नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी,अहुरा बिल्डर्स आणि  सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर, सिंहगड इन्स्टिट्यूट, बढेकर ग्रुप हे उपप्रायोजक आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *