ॲड. प्रणिता देशपांडे यांची विश्व दलीत परिषदेच्या आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष तथा लिगल अडवायजर पदी नियुक्ती.


दिल्ली(विशेष प्रतिनिधी)- विश्व दलीत परिषद ( एक अंतर राष्ट्रीय आंदोलन)या जागतिक स्तरावील सामाजिक कार्य करणारी संघटना आहे त्या संघटनेची नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिण ची बैठक संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र पाल सिंह चमार यांच्या अध्यक्षते खाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीला संपन्न झाली. या बैठकीत पहिल्यांदाच संघटनेच्या आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष तथा लिगल अडवायजर या पदावर नेदरलँडस्थित मूळ भारतीय ॲड. प्रणिता अद्वैत देशपांडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

विश्व दलीत परिषदचे आंतरराष्ट्रीय तथा भारत भर सुरु असेलल्या कामावर प्रभावित होऊन जन्माने ब्राह्मण असून सुद्धा दलीत चळवळीत काम करण्याची इच्छा नेदरलँड स्थित अत्यंत प्रतिष्ठित अशा उद्योजक आणि प्रसिद्ध वकील आंतरराष्ट्रीय पत्रकार असलेल्या ॲडवोकेट प्रणिता अद्वैत देशपांडे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या कडे व्यक्त केल्यानुसार त्यांच्या कामाचे स्वरूप आणि व्याप्ती पाहून त्यांची नियुक्ती संघटनेच्या अंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा लिगल अडवायजर पदी नियुक्ती केली आहे.

अधिक वाचा  अण्णा हजारेंचं मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनाचा इशारा देणं ही बाब अनाकलनीय

त्यांच्या नियुक्ती बद्दल अंतर राष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र पाल सिंह चमार, राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड, राष्ट्रीय महासचिव प्रोफेसर डॉ वाल्मीक के सरवदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन रेवाप्पा माने, राष्ट्रीय सचिव हरिभाऊ गायकवाड, महाराष्ट्र अध्यक्ष ॲडवोकेट शिरीन वारे, तामिनाडू चे प्रदेश अध्यक्ष विनायगा मूर्ती, तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा, गुजरात चे प्रभारी विनोद जाधव,प्रदेश प्रवक्ते तथा विधी सलहागार ॲडवोकेट गजानन क्षीरसागर, प्रदेश महासचिव पंकज खरात, प्रदेश संघटक विशाल इंगळे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड ज्योत्स्ना भिवसणे, प्रदेश सांस्कृतिक विभाग प्रमुख ॲडवोकेट संजय घाघरे,प्रदेश कार्यालयीन सचिव विशाल गढवे,प्रदेश प्रसिद्धी प्रमुख सागर वाघमारे, प्रदेश महासचिव अशोक कांबळे, यांनी अभिनंदन केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love