संजय काकडे पुन्हा ‘अॅक्टिव मोड’मध्ये ; म्हणाले.. पुणे लोकसभेची जागा सहजासहजी जिंकू

Sanjay Kakade again in 'active mode'
Sanjay Kakade again in 'active mode'

पुणे(प्रतिनिधि)– राजकीय गणित मांडण्यात पंडित असणारे भाजप नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे हे पुन्हा ‘अॅक्टिव मोड’मध्ये आले आहेत. पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ कोथरूड विधानसभेच्या भागात काढलेल्या प्रचार फेरीमध्ये संजय काकडे सक्रिय झाल्याचे दिसले. त्यामुळे संजय काकडे हे नाराज असल्याच्या चर्चांवर पडदा पडला आहे. दरम्यान, पुणे लोकसभा हा भाजपचा बालेकिल्ला असून यावेळीही आम्ही पुणे लोकसभेची जागा सहजसहजी जिंकू असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला आहे.

पुणे लोकसभेसाठी भाजपमधून इतर इच्छुकांबरोबरच संजय काकडेही इच्छुक होते. त्यांनी तसे बोलूनही दाखवले होते. त्यानंतर भाजपच्या महाराष्ट्राच्या पहिल्या यादीतच मुरलीधर मोहोळ यांचे नाव पुणे लोकसभेसाठी जाहीर झाले. मात्र,त्यावेळीही जोपर्यंत ‘बी फॉर्म’ देण्यात येत नाही तोवर मी उमेदवारीसाठी प्रयत्न करत राहील,असे संजय काकडे म्हणाले होते. त्यामुळे संजय काकडे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते आशिष शेलार यांनी काकडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय काकडे यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची समजूत काढली. त्यानंतर ते सक्रिय झाले आहेत. संजय काकडे सक्रिय झाल्यामुळे मोहोळ यांच्या मताधिक्क्यात आणखी वाढ होण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अधिक वाचा  कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का?- कोणाला म्हणाले अजित पवार?

दरम्यान, “आपले जे काही मुद्दे होते ते पुणे शहर अध्यक्षांपासून राज्यातील आणि देशाच्या नेत्यांपर्यंत पोहोचवले आहेत असे सांगतानाच मोहोळ यांच्या प्रचारात 30 एप्रिल नंतर सहभागी होणार असल्याचे सांगितले होते आणि त्याप्रमाणे सक्रिय सहभागी झालो असल्याचे संजय काकडे यांनी म्हटले आहे. गेल्या 10 वर्षांपासून पुणे लोकसभा हा भाजपचा बालेकिल्ला झाला असून यावेळीही पुणे लोकसभेची जागा आम्ही सहजासहजी जिंकू” असा आत्मविश्वास असल्याचेही संजय काकडे यांनी म्हटले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love