अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू


पुणे -अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा आज दुपारी नंदुरबार जिल्ह्यातील धाडगाव तालुक्यात नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अशा अकाली निधनाने संपूर्ण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिवारामध्ये शोककळा पसरली आहे. 

मुंबईत राहणाऱ्या अनिकेत यांनी प्रतिष्ठित रुईया महाविद्यालयातून MSc पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून २०११ पासून ते विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये मुंबई महानगर मंत्री, कोंकण प्रांत मंत्री, राष्ट्रीय मीडिया सह-संयोजक, राष्ट्रीय मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत असताना अनेक आंदोलनांच्या माध्यमातून अनिकेत यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. विचारधारेला समर्पित अनिकेत विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सतत कार्यरत राहिले. महाराष्ट्रातील विद्यार्थी चळवळीचे यशस्वी नेतृत्व अनिकेत ओव्हाळ यांनी केले आहे. 

अधिक वाचा  शिवाजी विद्यापीठ पेपर फुटी प्रकरण : अभाविपचे लोटांगण घालत आंदोलन

अनिकेत ओव्हाळ यांचे अकाली निधन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिवारासाठी कधीही न भरून येणारे नुकसान आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस. सुब्बैया, राष्ट्रीय महामंत्री सुश्री निधि त्रिपाठी तसेच राष्ट्रीय संघटन मंत्री श्री आशीष चौहान यांनी अनिकेतच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दु:खद आणि वेदनादायक प्रसंगी संपूर्ण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिवार अनिकेत ओव्हाळ यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना अशी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love