#Abdul Sattar : आमच्यासारखाच निर्णय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबाबतही लागेल- अब्दुल सत्तार


पुणे(प्रतिनिधि)–जेवढे संख्याबळ आमच्याकडे होते, तेवढेच संख्याबळ अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे आमच्यासारखाच निर्णय अजित पवार(Ajit Pawar)  यांच्या राष्ट्रवादीबाबतही(NCB) लागेल, असा विश्वास राज्याचे अल्पसंख्यांक आणि पणनमंत्री(Minister of Minorities and Marketing) अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. हातकणंगलेच्या(Hatkanagle)  जागेवर शिंदे गटाचे धैर्यशील माने(Dhairyashil Mane) हे खासदार आहेत. त्यामुळे ही जागा सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही सत्तार यांनी फटकारले. (A similar decision will be made regarding Ajit Pawar’s NCP)

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या(Maharashtra State Board of Agricultural Marketing) वतीने ‘मिलेट’ (Millet) (पौष्टिक तृणधान्य) महोत्सवाचे उद्घाटन सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. सत्तार म्हणाले, १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव होता. पण, अध्यक्षांनी आम्हाला न्याय दिला आहे. आमच्याकडे संख्याबळ होते. त्यामुळेच आमच्या बाजूने निर्णय होऊ शकला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडेही संख्याबळ आहे. त्यामुळे त्यांच्या बाजूने निर्णय होईल, यात कोणतीही शंका नाही. उद्धव ठाकरे आता म्हणे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. पण न्यायालयही आम्हाला न्याय देईल. युती का तोडली याच उत्तर ठाकरे यांनी द्यावे. ते उगाच संभ्रम निर्माण करत आहेत.

अधिक वाचा  जुलै-ऑगस्ट मध्ये देशात या कारणामुळे पुन्हा एकदा विजेचे संकट?

सदाभाऊ खोत यांनी हातकणंगलेची महायुतीने जागा रयत क्रांतीला सोडावी, अशी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर बोलताना सत्तार म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदरासंघाची जागा आमची आहे. तिथे आमचे खासदार धैर्यशील माने हे खासदार आहेत. त्यामुळे हातकणंगलेची जागा सदाभाऊ यांनी मागण्याचा संबंधच येत नाही. कोणत्याही शेतकऱयांचा माल आपण मार्केटयार्डमध्ये घेतो. माझ्या निर्णयावर सदाभाऊ खोत यांचे लायसन्स घेणायची गरज नाही. 

आव्हाड यांना हात जोडून माझी विनंती आहे, अशी वक्तव्य करून महाराष्ट्र राज्यातील वातावरण खराब करू नये, आव्हाडांचा बोलविता धनी दुसरा कोणी तरी असू शकतो, असे सांगत शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी बोलणे उचित ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

 मलाही वाटते शिंदे ३० वर्षे मुख्यमंत्री रहावेत…

अधिक वाचा  #Rohit Pawar: अजितदादांच्या अवतीभवती मलिदा  गँग - रोहित पवार

अमित शहा यांना वाटत असेल, ३० वर्ष सत्ता राहावी, पण जनता निर्णय घेत असते. मला पण वाटते, एकनाथ शिंदे ३० वर्षे मुख्यमंत्री राहतील. ज्याचे जास्त खासदार त्याची सत्ता असते. हवेची दिशा पाहून मी काम करत नाही. माणसे पाहून, पक्ष पाहून मी काम करतो, असेही सत्तार यांनी सांगितले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love