महसूल खात्यातील बड्या आयएएस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच स्वीकारताना रांगेहाथ पकडले : सीबीआयची कारवाई


पुणे—पुण्यामध्ये सीबीआयने (CBI) शुक्रवारी मोठी कारवाई करत एका बड्या आयएएस (IAS) अधिकाऱ्याला आठ लाखांची लाच ( bribe) स्वीकारताना रांगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. अनिल गणपतराव रामोड (Dr. Anil Ganpatrao Ramod)असं आयएएस अधिकाऱ्यांचं नाव असून ते पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त (Additional Divisional Commissioner)आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. रामोड यांना ८  लाख रुपये स्वीकारताना सीबीआयने पकडले. तक्रारदाराने या संदर्भात सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. प्राप्त तक्रारीची दखल घेत सीबीआयने सापळा रचला होता. त्यानुसार छापेमारी करत अनिल रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं आहे.  

दरम्यान, या कारवाईनंतर दुपारी सीबीआयने रामोड यांचे कार्यालय, क्विन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील ‘ऋतुपर्ण’ सोसायटी या खाजगी निवासस्थानीही छापा टाकला आहे. अधिकाऱ्यांनी याठिकाणी पैसे मोजण्याचे मशीन मागवून घेतल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा  पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार : नारायण राणे

रामोड यांच्याविषयी मागील काही दिवसांपासून तक्रारी कानावरती येत होत्या. या तक्रारींची शाहनिशा करुन सीबीआयने रामोड यांच्याभोवती सापळा लावला होता. आज लाच स्वीकारताना अखेर सीबीआयने रामोड यांना अटक केली. रामोड हे मुळचे नांदेडचे असून मागील २  वर्षांपासून ते पुण्यात अरितिक्त विभागीय आयुक्त आहेत. दरम्यान, सीबीआयचा तपास अद्याप सुरु असल्याने या कारवाईमध्ये काय आढळून आले याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love