शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या रोप्य महोत्सव वर्षानिमित्त शंभर वर्ष जुनी तुतारी पवार साहेबांना भेट

a hundred year old trumpet was presented to Mr. Pawar Saheb
a hundred year old trumpet was presented to Mr. Pawar Saheb

पुणे(प्रतिनिधि)–लोकसभेच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याबद्दल २२ जून २०२४ रोजी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने, संस्थापक, अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या संकल्पनेतून साकारलेले १०० वर्ष जुनी  तुतारीचे भव्य सन्मानचिन्ह लोकनेते शरदचंद्र पवार साहेबांना भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे त्याबद्दल आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी मार्गदर्शन केले तसेच समाजोपयोगी उपक्रमांना विशेष प्राधान्य द्यावेत अशा सुचना लक्ष्मीकांत खाबिया व उपस्थित असलेल्या प्रतिष्ठानच्या पदाधिका-यांना केल्या. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या पदाधिका-यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी केलेल्या कामांचा लेखा जोखा साहेबांच्या पुढे मांडण्यात आला. संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी प्रतिष्ठानने केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार बंड, विश्वस्त राहूल देशपांडे, विवेक थिटे, संदीप राक्षे,

अधिक वाचा  ‘देवेंद्रजी, आपसे ये उम्मीद न थी’- सुप्रिया सुळे

तेरव चित्रपटाचे दिग्दर्शक व शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान वर्धा जिल्हाध्यक्ष हरिषजी इथापे, पुणे जिल्हाध्यक्ष अश्विनी पाचारणे, जळगावचे जिल्हाध्यक्ष विनोदजी भोईटे, नागपूरचे जिल्हाध्यक्ष रोशनजी खोब्रागडे, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष जगदीशजी जुनगरी, बुलढाणा जिल्हाध्यक्ष ह.भ.प हरिदासजी आखरे, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष पांडुरंगजी गजगेश्वर, नाशिकचे जिल्हाध्यक्ष किरणजी सानप, संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव शिंदे, पुणे कार्याध्यक्ष डाॅ. दादासाहेब गारगोटे, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जगताप सी ए आनंद देवतरसे, अरविंद कांबळे, संकेत राक्षे हे उपस्थित होते

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love