अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन: महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे अभाविप बैठकीत दर्शन


पुणे – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन आज गुरुवार दि. २५ मे ला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे येथे अभाविप चे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल आणि राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान यांच्या हस्ते विद्येची देवी माता सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून करण्यात आले. सभेच्या सुरुवातीला देशभरातून आलेल्या प्रतिनिधींचे ढोल ताशांच्या गजरात, पुष्पवृष्टी करून आणि स्थानिक पारंपरिक टोप्या घालून स्वागत करण्यात आले.

अभाविप चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजशरण शाही म्हणाले की, पुण्याच्या मातीत जन्मलेल्या सुपूत्रांचे देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात तसेच राष्ट्र पुनर्निर्माणात अतिशय महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यांचे कार्य संपूर्ण देशाचे प्रेरणादायी आहे.  पुण्यातील शिक्षण संस्थानी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. भारताच्या संस्कृतीला समृद्ध करण्यासोबतच भारतीय ज्ञान परंपरेत देखील पुण्याचे महत्वाचे स्थान आहे. पुण्यात संपन्न होणाऱ्या या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीतून अभाविप कार्यकर्त्यांना नवीन दिशा तसेच नवीन संकल्प मिळेल.

अधिक वाचा  अजित पवार म्हणतात...वाईन आणि दारू यात जमीन-अस्मानाचा फरक

अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री श्री.याज्ञवल्क्य शुक्ल म्हणाले, “अभाविपच्या नेतृत्वाखाली छात्रशक्ती सकारात्मक बदलासाठी प्रयत्नशील आहे. पुणे हे संस्कृती, शक्ती व राष्ट्रीय प्रबोधनाचे केंद्र आहे. अभाविप गैर व्यवस्थेच्या विरूद्ध सातत्याने लढा देत आहे.तसेच, अधिकाधिक चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी कटीबद्ध आहे. ही भारताची वेळ आहे. शिक्षण हे सकारात्मक बदलाचे माध्यम आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love