काश्मीरमध्ये भारत – पाकिस्तान सीमेवर उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा


पुणे–शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत. महाराजांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत – पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरच्या किरण व तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार आहे.

काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर दत्तात्रय डोईफोडे यांच्या पुढाकाराने मूर्ती साकारण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीचे प्रमुख अभयराज शिरोळे व आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी या उपक्रमासाठी नियोजन केले आहे.

अधिक वाचा  शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरेंइतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही: पुरंदरेंचं लिखाण कधीच पटले नाही- शरद पवार

मार्च २०२३ महिन्याच्या अखेरीस पुतळा बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. आम्ही पुणेकर संस्थेतर्फे महाराष्ट्रातील शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड, तोरणा,  शिवनेरी, राजगड,  प्रतापगड या किल्ल्यांवरील माती व पाणी भूमिपूजनासाठी नेण्यात येणार असल्याचे हेमंत जाधव यांनी सांगितले.

अभयराज शिरोळे म्हणाले, शिवाजी महाराजांनी शत्रूंना आपल्या युद्धनीती आणि धाडसी कर्तृत्वाने पळवून लावले. त्यांच्या गनिमी काव्याचा इतर देशांनी देखील आदर्श घेतला.  सीमेवरील भारतीय जवानांना महाराजांचा आदर्श व त्याद्वारे स्फुर्ती मिळावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भारत पाकिस्तान सीमेवर स्थापन करण्यात येत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love