दिशा सालियान मृत्यू प्रकरण : ७ मार्चनंतर दूध का दूध – पाणी का पाणी : का म्हणाले असे चंद्रकांत पाटील?


पुणे— दिशा सालियानच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले याचे सत्य येत्या ७ मार्चनंतर बाहेर येईल. याबाबत काहीही राजकारण होत नाही. ७ मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील, दूध का दूध – पाणी का पाणी होईल, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे, असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी केल्याने खळबळ उडाली आहे.

आतापर्यंत केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री आणि नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे हेच दिशा सालियन प्रकरणावर वारंवार बोलत होते. आता थेट चंद्रकांत पाटील यांनीच या प्रकरणावर भाष्य केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अधिक वाचा  भटकती आत्मा हा उल्लेख कोणाला डोळ्यासमोर ठेवून केला आहे का? हे मोदींना विचारून तुम्हाला सांगतो - अजित पवार

सुशांतसिंग राजपूतची व्यवस्थापक राहिलेली दिशा सालियान हिच्या मृत्यूची चौकशी सीबीआय यंत्रणेमार्फत करण्यात यावी, मृत्यूपूर्वी ती गरोदर नव्हती आणि तिच्यावर बलात्कार झाला नव्हता असा अहवाल आल्यानंतरही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र, पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिच्यावर बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला होता.

राज्य महिला आयोगाकडे दिशा सालियान प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मालवणी पोलिसाना चोवीस तासात दिशा सालियान प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे दिशा सालियान प्रकरणावरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडी घेतली आहे आणि त्यांनी ७ मार्च नंतर दिशा सालियान प्रकरणाचा उलगडा करुन सर्व पुरावे सादर करणार असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता काय वळण लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अधिक वाचा  केंद्र सरकारने ड्रग्जमुक्त अभियान राबवावे -सुप्रिया सुळे

पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात ७ मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love