राष्ट्रीय समाज पक्ष पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविणार – प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांची घोषणा

राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधी)–पुणे महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय राष्ट्रीय समाज पक्षाने घेतला आहे, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी केली.

 पुण्यात आयोजित सत्कार समारंभ व महिला रोजगार मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांचा सत्कार पुणे शहराध्यक्ष विनायक रूपनवर व पुणे शहर संपर्कप्रमुख अंकुश देवडकर यांच्या हस्ते फुले पगडी व नोटांचा हार घालून करण्यात आला.

पुणे शहर महिला उपाध्यक्षा सुनीता किरवे यांच्या अध्यक्षतेखाली महिला कला, कौशल्य व उद्योजक विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे शहर उपाध्यक्ष बालाजी पवार यांच्या बालाजी महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेस पंचवीस रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, संजय माने, पुणे शहर युवक अध्यक्ष उमेश कोकरे,. पुणे शहर सोशल मीडिया अध्यक्ष बिरुदेव अनुसे, तृप्ती धनवटे, अनिता डफख, प्राजक्ता परचुरे, ऍड. मंजुषा नयन, सचिन गुरव, राजेश लवटे, शरद शेजवळ, सुजित विरकर, प्रथमेश गवळी, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *