गिरीष भेलके यांच्यावतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन : 940 तरुणांना नियुक्तिपत्र : 30 कंपन्यांचा सहभाग 


पुणे-कोथरूड भेलकेनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे सरचिटणीस गिरीष भेलके यांच्यावतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आशिष गार्डन येथे पार पडलेल्या या महोत्सवात संपूर्ण जिल्ह्यातून नोकरी इच्छुक तरुणांनी सहभाग नोंदविला.

करोना महामारी दरम्यान अनेक युवकांना आपली नोकरी गमवावी लागली. अशा कठीण परिस्थितीमध्ये युवकांना मदतीचा हात देण्याच्या हेतूने तसेच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष तसेच कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तसेच तरुणांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी भाजप कार्यकारीनेचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी 30 कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला तसेच पुणे शहर पुणे जिल्ह्यातील सुमारे दोन हजार युवकांनी भाग घेतला. नियुक्तीपत्र मिळालेल्या तरुणांनी यावेळेस आयोजकांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

अधिक वाचा  परीक्षा शुल्क परत मिळण्यासाठी अभाविपचे आंदोलन: विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत शुल्क परत करण्याचा निर्णय; अभाविपचे आंदोलन यशस्वी

कार्यक्रमाचे आयोजक गिरीष भेलके म्हणाले, कोविड मुळे अनेक युवकांना आपली नोकरी गमवावी लागली. लॉकडाऊन मुळे अनेक व्यवसाय बंद पडले. अशा कठीण परिस्थितीमध्ये एक खारीचा वाटा तसेच समाजाप्रती आपली बांधीलकी जपण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले. तरुणांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आमचे मार्गदर्शक चंद्रकांतदादा पाटील, तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे या उपक्रमास मार्गदर्शन लाभले. मी या सर्वांचा तसेच उपक्रम यशस्वी होण्यासाठी झटलेल्या सर्व भाजप कार्यकर्त्यांचा आभारी असुन यापूढे अशा विधायक कार्यक्रमांचे आयोजन माझ्याकडून केले जाईल असा मनोदय यावेळी गिरीश भेलके यांनी व्यक्त केला.

गिरीश भेलके यांनी याआधी अनेक समोजोपयोगी तसेच विधायक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये मुलांसाठी लसीकरण शिबिर, अत्यल्प उत्पादन असणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरण शिबीर,  पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर, आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव तसेच ऑनलाईन उखाणे स्पर्धा, जील्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, मतदार नोंदणी अभियान, मोफत आधारकार्ड शिबिर अशा अनेक यशस्वी उपक्रमांचे आयोजन केले आहे .

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love