शाळेचा ड्रेसकोड पाळलाच पाहिजे पण..- जयंत पाटील


पुणे—भाजपचे नेते किरीट सोमय्यां यांनी पुणे महापालिकेत त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी मुख्यमंत्र्याचा आदेश होता असा आरोप केल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. “मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे असे आम्हाला आढळून आलेले नाही. तिथे स्थानिक नगरपालिकेत बाचाबाची झाली होती. त्याला जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही,” असे जयंत पाटील म्हणाले.

पुण्यात शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले होते. धक्काबुक्की नंतर सोमय्यांना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.   त्यानंतर माध्यमांसोबत बोलताना किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच महापालिकेमध्ये गुंड पाठवले होते असा आरोप केला होता. जयंत पाटील यांनी पुण्यात माध्यमांसोबत बोलताना ही  प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचा  तब्बल २४ वर्षांनी एकत्र येत कण्वमुनी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या जुन्या आठवणी

दरम्यान, जी परिस्थिती असेल त्यानुसार पोलीस गुन्ह्याचे कलम लावतात. धक्काबुक्की, शिवीगाळ यासाठी कलम वेगवेगळे आहेत. जी घटना तिथे घडली त्यानुसार पोलीसांनी कलम लावली आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने त्यांना सुरक्षा पुरवायला हवी होती. ते कमी पडल्याने किरीट सोमय्यांचे प्रकरण धक्काबुक्की पर्यंत गेले, असे जयंत पाटील म्हणाले.

शाळेचा ड्रेसकोड पाळलाच पाहिजे पण..

कर्नाटकमधील हिजाब घालण्याच्या वादावरून सध्या देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. उडुपीमधील एका महाविद्यालयाने हिजाब घातलेल्या मुस्लीम मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारल्यानंतर त्यावरून देशभर राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत. या वादाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, “प्रत्येकाने कोणता वेश परिधान करायचा याचा अधिकार भारतीय घटनेने दिला आहे. याबाबत व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतला जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे. शाळेचा ड्रेसकोड पाळलाच पाहिजे पण जे पूर्वीपासून चालू आहे त्यामध्ये व्यत्यय आणून वेगळी भूमिका निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटकात होत आहे. त्या शाळेत पूर्वी ते चालू होते पण ते आता थांबण्यासाठी मुद्दाम हा विषय तयार करण्यात आला आहे. सध्या केंद्र सरकारच्या अपयशांकडून लक्ष हटवण्यासाठी प्रयत्न आहे,” असा आरोप त्यांनी केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love