निळू फुले नाट्यगृहाची संकल्पना अजित पवारांची : श्रेयासाठी महापौरांचे नाट्यगृहाबाहेर बोर्ड- राजेंद्र जगताप


पिंपरी(प्रतिनिधी) : नवी सांगवी येथे भव्यदिव्य नाट्यगृह उभे राहिले. मात्र, नाट्यगृह उभारणीसाठी ज्यांनी प्रयत्न केले, ते बाजूलाच राहिले असून, सध्या श्रेयासाठी चढाओढ सुरू झालेली आहे. ही चढाओढ अगदी नाट्यगृह परिसराच्या विद्रुपीकरणापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी सांगितले, की नटसम्राट निळू फुले असे नाव असलेल्या या नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाजवळ संकल्पना म्हणून महापौर माई ढोरे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. ही पाटीही पदपथावर लावण्यात आल्याने पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. मुळात पिंपळे गुरवमधील नाट्यगृहाची संकल्पना ही पालकमंत्री अजित पवार यांची आहे. या नाट्यगृहासाठी तत्कालीन नगरसेवक म्हणून आपण स्वतः पाठपुरावा केला व आपल्याच कार्यकाळात नाट्यगृहाचे काम पूर्णही झाले. मात्र, सत्ताधारी भाजपने माझ्या नावाचा कोनशीलेवर जाणीवपूर्वक उल्लेख टाळला आहे. मात्र, केवळ श्रेय घेण्याच्या उद्देशाने संकल्पना म्हणून महापौर माई ढोरे यांच्या नावाचा नामफलक पदपथावर लावण्यात आला आहे. हा फलक काढून टाकण्याची मागणी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे करणार आहे.

अधिक वाचा  '#टाटा मोटर्स’च्या वतीने पुणे येथे RED #DARK श्रेणीसह बीएस6 फेज II सादर  

श्रेय घेण्यासाठी पुढे येणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत काहीही देणेघेणे नसल्याची परिस्थिती आहे, असा आरोपही राजेंद्र जगताप यांनी केला आहे.

नाट्यगृहाच्या इतिहासाविषयी :

1996, 1997 ला सदर जागेवर नाट्यगृहाचे आरक्षण महापालिकेने टाकले. असे असतानाही आरक्षण जागेतच तत्कालीन अधिकाऱ्यांनी तीन लोकांची याच जागेत गुंठेवारी करून दिली. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. परिणामी 2012 पर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. 2012 च्या महापालिका निवडणुकीनंतर तत्कालीन नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी याप्रकरणी लक्ष घातले. राजेंद्र जगताप यांनी मध्यस्थी करीत गुंठेवारी केलेल्या नागरिकांना तत्कालीन महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे नेले. शेवटी तडजोड होऊन हे प्रकरण मिटले आणि नाट्यगृह उभारणीचा मार्ग मोकळा झाला.

2012 ते 2017 या कालावधीत नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले. केवळ उद्घाटन बाकी होते. 2017 च्या महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाले आणि सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी नाट्यगृहाच्या फलकावर आपल्या मर्जीतल्या राजकीय लोकांची नावे टाकली. मुळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या नाट्यगृहाचा पायाभरणी कार्यक्रम ह.भ.प. रामकृष्णदास लहवीतकर महाराज, तत्कालीन महापौर शकुंतला धराडे व तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या हस्ते पार पडला. त्यामुळे त्यांची नावे व विद्यमान स्थानिक नगरसेवक म्हणून राजेंद्र जगताप यांचे नाव कोनशिला फलकावर टाकणे अपेक्षित होते. मात्र, भाजप नेत्यांनी राजकीय सूडबुद्धीने आमची नावे टाळून त्यांच्या राजकीय सोयीने नावे टाकण्यात आली आहेत.

अधिक वाचा  सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष छत्रपती राजर्षी शाहु महाराज

           – राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love