पुण्यातील भन्नाट नावांच्या मंदिरांनी उत्सुकता चाळवत,आपलेपणा जपला – गाडगीळ


पुणे -आजूबाजूला सोन्याची अनेक दुकाने असलेला सोन्या मारुती, शाळेत जाताना आजी सांगायची आणि नंतर सवयीचा भाग झालेला दाढीवाला दत्त, हा गणपती नकट्या नाकाचा वगैरे आहे का, अशी उत्सुकता चाळवणारा चिमण्या गणपती आणि खून, कट, कारस्थाने यांच्या अनेक कहाण्या सांगणारा खुन्या मुरलीधर या पुणे शहरातील भन्नाट नावांच्या मंदिरांनी उत्सुकता चाळवित आपलेपणा जपला, अशा शब्दांत प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी आपल्या आठवणीना उजाळा दिला.             

पुण्यातील तेजस गोखले या तरुणाने आपल्या ‘खलबत्ता’ या उपक्रमाअंतर्गत पुण्यातील विविध मंदिरांची चित्रे व त्यामागील रंजककथा सांगणा-या ‘देव बिव’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन भांडारकर रस्त्यावरील आर्ट टू डे गॅलरी येथे केले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटना वेळी गाडगीळ बोलत होते. या वेळी ‘देव बिव’ या पुस्तकाचे व दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.   

अधिक वाचा  #Sharad Mohol Murder Case : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

पुणे शहरात अनेक राजकीय लोकांनी मंदिरे उभी करत श्रद्धेचे स्त्रोम माजविलेले आणि ‘कॅल्क्यूलेटेड’ देवदर्शने सुरु झालेली आमच्या पिढीने पाहिली, याच काळात मारुती, गणपतीची ही जुनी मंदिरे भाबडी वाटू लागली असे सांगत गाडगीळ पुढे म्हणाले की, या जुन्या मंदिरांमध्ये सुरुवातीच्या काळात कोल्हटकरबुवा, निझामपूरकर यांसारख्या कीर्तनकारांची प्रवचने व्हायची. एरवी पाठ न होणारी स्तोत्रे याच कार्यक्रमांमध्ये कानावर पडायची. याच ठिकाणी शब्दोच्चार, आवाजाची पट्टी यांची आवड निर्माण झाली, चालू घडामोडीचे शिक्षण याच कार्यक्रमामधून मिळाले. याचा उपयोग मुलाखतकार म्हणून काम करताना झाला.”

इतरांना नावे ठेवणा-या पुणेकरांना पत्ता सांगायची हमखास खूण असलेली शहरातील ही मंदिरे आणि देव भन्नाट नावे देत आपलेसे केले, असे गाडगीळ यांनी नमूद केले.

अधिक वाचा  अभाविपचे 'घर घर तिरंगा-मन मन तिरंगा'अभियान: पुणे शहरात ११११ कार्यक्रमांचा संकल्प

तेजस गोखले आणि त्यांच्या चमूने विविध माध्यमांद्वारे एकत्रित केलेली ही दिनदर्शिका, पुस्तकरुपी माहिती नव्या, तरुण पिढीपर्यंत मराठी भाषेच्या अभिनव छटा पोहोचावीत आहे, याचा मला आनंद आहे, असेही गाडगीळ यांनी सांगितले.

पुण्यातील चित्र विचित्र नावे असलेल्या २९ मंदिरांपैकी बहुतांश मंदिरे ही मारुतीची आहेत, कालानुरूप त्याच्या जवळ गणपतीचे मंदिर वसले, मंडळे झाली आणि तेच मोठे झाले. मात्र आजही लहानसे मारुतीचे मंदिर शेजारी उभे आहे, याकडे तेजस गोखले यांनी लक्ष वेधले. 

मराठी भाषेसाठी काहीतरी करावे, या उद्देशाने आम्ही ‘खलबत्ता’ या उपक्रमाला सुरुवात केली असे सांगत तेजस गोखले म्हणाले, “पुणे शहराला मोठा इतिहास आहे. त्यामुळे येथील मंदिरे देखील तितकीच जुनी आणि हटके नावं असलेली आहेत. मराठी भाषेत त्यातही नव्या पिढीपर्यंत या मंदिरांच्या नावामागील रंजक कथा पोहोचाव्या या हेतूने आम्ही हे प्रदर्शन आयोजित करीत आहोत. या प्रदर्शनामध्ये शहरांतील २९ चित्रविचित्र नावे असलेल्या देवांच्या नावामागील रंजक कथा आम्ही मांडल्या आहेत. या सांगताना त्या अवजड भाषेत न सांगता अगदी १० ते १२ ओळींमध्ये सांगितल्या असल्याचे गोखले यांनी सांगितले.

अधिक वाचा  भक्तीच्या कल्लोळात लाखो वैष्णवांच्या साक्षीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

शनिवार दि. २७ व रविवार दि. २८ नोव्हेंबर रोजी भांडारकर रस्त्यावरील आर्ट टू डे गॅलरी येथे सकाळी १०.३० ते रात्रौ ८.३० या वेळेत सदर प्रदर्शन रसिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

देव – बिव’ प्रदर्शनामध्ये पुण्यातील जिलब्या, भांग्या, पावट्या, खुन्या ही नावं मानाने मिरवणारे मारुती, गणपती, कृष्ण, राम, दत्त यांच्या नावांमागील रंजक कथा, चित्रे आणि दृकश्राव्य (audio visuals) स्वरूपात पाहता येणार आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love