मलिक यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अखत्यारीतील वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे सात ठिकाणी ईडीचे छापे


पुणे—राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कलगितुरा सुरू असताना मलिक यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अखत्यारीत वक्फ बोर्डाच्या  जमीन घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे सात ठिकाणी ईडीने छापेमारी सुरू केली आहे.

याबाबत मुश्ताक अहमद शेख यांनी 3 नोव्हेंबरला तक्रार दिली आहे. वक्फ बोर्डाच्या मालकीची हिंजवडी आयटी पार्कजवळ असलेली चार हेक्टर जागा दुसऱ्या एका ट्रस्टची असल्याचे दाखवण्यात आले आणि या ट्रस्टकडून ही जागा शासनाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत अधिग्रहित केली. अधिग्रहित केल्यानंतर ही जागा शासनाच्या मालकीची झाली आणि त्यापोटी शासनाने नऊ कोटी साठ लाख रुपये त्या ट्रस्टला दिले. त्यासाठी वक्फ बोर्डाच्या सीईओंनी एनओसी दिली होती. त्यामुळे यामध्ये मोठे लोक सहभागी असू शकतात. मी यामध्ये नवाब मलिकांचे नाव घेत नाही पण यामध्ये मोठे लोक असू शकतात. हिंजवडी आयटी पार्क जवळ असलेली ही चार हेक्टर जागा आहे. ईडी ने इतक्या तत्परतेने केलेल्या कारवाईबाबत मी समाधानी आहे,” असं  तक्रारदार मुश्ताक अहमद शेख यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  सासू-सासरे-मेव्हणा पत्नीला नांदण्यास पाठवत नाही म्हणून तरुणाची आत्महत्या

या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. वक्फच्या एकूण ७ ठिकाणी शोध सुरू असल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी हे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वक्फ जमीन प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे हा तपास सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, जमीनीच्या व्यवहारात माझा वैयक्तिक काहीच संबंध नाही. याला तत्कालिक अध्यक्ष किंवा अल्पसंख्यांक मंत्री होते त्यांच्या कार्यकाळात हा घोटाळा झाला असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love