देशात जसं गुजरात राज्य आहे तसं महाराष्ट्र पण राज्य आहे- का म्हणाले असं अजित पवार


पुणे-गेल्या वेळेपेक्षा यावेळच्या चक्रीवादळाची तीव्रता तुलनेने कमी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आला होता, पण तो दौरा रद्द झाला.नंतर ते थेट गुजरातला गेले आणि त्यांनी प्रस्ताव नसतानाही एक हजार कोटीची मदत जाहीर केली. परंतु, देशात जसं गुजरात राज्य आहे तसं महाराष्ट्र पण राज्य आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान आले असते आणि मदतीचा आकडा जाहीर झाला असता तर,योग्य झालं असतं अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

पुण्यामध्ये आज अजित पवार यांचा उपस्थितीत  कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोदींनी सर्व राज्यांना मदत केल्याचा दावा केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पाय जमिनीवर आले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन अशी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना पवार म्हणाले “वादळ होतं त्यावेळी मी नियंत्रण कक्षात बसून होतो. नुकसान झालंय,काय याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात होतो. पालकमंत्र्यानी तिथं दौरे केले.

अधिक वाचा  मशिदीतही चर्चा पंतप्रधानांच्या ‘सबका साथ, सबका विकासाची’: मोहोळ यांच्या झैनी मशिदीत बोहरी बांधवांशी गप्पा 

दरम्यान नितीन राऊत यांचा जीआर बाबतचा वादाचा बाबत विचारल्यावर पवार चिडले. ते म्हणाले “नितीन राऊत यांच्या बद्दल मला माहिती नाही .जी आर बाबत मला माहिती नाही. त्यांनी काय सांगितलं हे मला माहिती नाही “

पदोन्नती बाबत बोलताना पवार म्हणाले “हायकोर्टाने सांगितल्यावर ती बाब ऐकावी लागते.अजून अंतिम निर्णय झालेला नाही. कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊ. महाविकासआघाडी सरकारची  पण भूमिका आहे.सरकार दुर्लक्ष करतंय अशी बाब जाऊ नये यासाठी काळजी घेऊ. त्यांचं वेगळं मत असेल तर कोर्टाने दिलेल्या निर्णयावर पुढील बेंचच्या पुढे जाता येतं

संभाजी राजे यांनी सारथी बाबत केलेल्या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले “प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे. संस्थेला जागा नव्हती ती घेतली, आता मदत होतेय. जलसंपदा विभागाची जागा पण देत आहे माझी आणि त्यांची भेट झाली तर मी त्यांना माझ्यावर जबाबदारी आल्यावर मी काय काय केलं हे सांगेन.”

अधिक वाचा  राष्ट्रपतीपद निवडणूक : द्रौपदी मुर्मू यांना अनेक विरोधी पक्षांकडूनही क्रॉस व्होटिंग : कशा होऊ शकतात मुर्मू 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी?

दरम्यान दहावी परीक्षा बाबत कोर्टाचा ताशेर्यांवर विचारलं असता अजित पवार म्हणाले “कंटेंम्प्ट ऑफ कोर्ट होणार नाही याची काळजी घेतली जाईल.मुलांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ. 10 वीच्या परीक्षाबाबत कोर्ट काय म्हटलं हे बघावं लागेल.शिक्षण विभागाशी चर्चा करावी लागेल ,कोर्टाचा अवमान होणार नाही हे बघावं लागेल”

दरम्यान, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्यास राज्य सक्षम असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

तिसऱ्या लाटेबद्दल पवारांना विचारणा केली असता, राज्य तिसऱ्या लाटेशी लढण्यास सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यावर त्यांनी जिल्ह्याबद्दलही माहिती दिली. पुण्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुण्यात आता सर्व प्रकारचे बेड्स असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

अधिक वाचा  आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का?- का म्हणाले असे अजित पवार?

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी इन्जेक्शन्स मात्र राज्याकडे पुरेशी उपलब्ध नाहीत. त्यांचा तुटवडा आहे. मात्र, त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. या इन्जेक्शन्ससाठी थेट उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यांना सर्व इन्जेक्शन्स केंद्राकडे देणं बंधनकारक असल्याने ते थेट देऊ शकत नसल्याची माहितीही पवारांनी यावेळी दिली.

आता जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिविर यांचा तुटवडा नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, ग्रामीण भागातली रुग्णसंख्या अजूनही अपेक्षेप्रमाणे आटोक्यात आली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love