पुणे-कामगार वर्गाला जाहीर झालेली आर्थिक मदत लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचती करावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी शनिवारी कोरोना आढावा बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे ही बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांना बापट यांनी जिल्हास्तरावर राज्य शासनाची आर्थिक मदत आल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही हा या बैठकीचा अजेंडा होता. पथारीधारक,घरेलू कामगार, रिक्षाचालक, ज्येष्ठ नागरिक व इतरांना राज्य शासनाकडून देण्यात आलेली मदत जिल्हास्तरावर आलेली आहे. तथापि ती अद्याप लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. ही मदत त्यांना लवकरात लवकर मिळणे गरजेचे आहे.
प्रशासनाने 15 मे पर्यंत लॉक डाउन वाढवल्यामुळे या लाभार्थ्यांची उपासमार होत आहे. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर होत आहे. म्हणून ही मदत पोहोच विण्यासाठी प्रशासनाने सामाजिक संघटना एनजीओ व लोकप्रतिनिधी यांची मदत घ्यावी. याकामी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य राहील. अशी भूमिका आम्ही पक्षाच्यावतीने मांडली. मागणी वाढल्याने लसीकरणाची मोहिम दीर्घकाळ चालवावी लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर दुसरा डोस देण्याबाबत ज्येष्ठांना प्राधान्य द्यावे या मुद्यावर आमचा भर आहे.अधिकाधिक लस मिळविण्यासाठी मी स्वतः दररोज केन्दाकडे पाठपुरावा करीत आहे.