पुणे- पुण्यातील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) ब्रिगेडियर अनंत नाईक यांनी पुणे रेल स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवर उद्यान एक्सप्रेसखाली उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप संजू शकलेले नाही. नाईक हे लष्कराच्या वैद्यकीय महाविद्याच्या प्रशासनचे प्रमुख होते.
मयत अनंत नाईक हे भुवनेश्वर येथील रहिवासी आहेतते ए एफ एम सी येथे कार्यरत होते. रविवारी सकाळी ते सरकारी गाडी घेऊन सोबत ड्रायव्हर बोडके याच्या सोबत पुणे रेल्वे स्थानक येथे आले. ड्रायव्हर बोडके यांना मी एम सी ओ मधून जाऊन येतो असे सांगून ते पुणे रेल्वे स्थानकात आले. त्यांनी १२.१५ मि. वाजता उद्यान एक्सप्रेसच्या इंजिन पुढे येऊन आत्महत्या केली सदरची घटना ही फलाट क्रमांक ३ येथे घडली त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सुसाईड नोट मिळून आली नाही. त्यांच्या आत्महत्येबाबतची माहिती त्यांचा मुलगा अभिषेक नाईक यास फोन द्वारे पोलिसांनी कळवली.
दरम्यान, पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असतं नाईक हे प्लॅटफॉर्म नंबर एक या ठिकाणी फिरत असताना दिसत आहेत तसेच त्यांनी चेन्नई एक्सप्रेस खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो यशस्वी झाला नाही,असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे..
या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर नायक यांचा मुलगा अभिषेक याला या घटनेची माहिती देण्यात आली. नायक यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पाहणी करण्यात आली.