नीलेश राणे मुख्यमंत्र्यांना म्हणाले…”तुम केहना कया चाहते हो??”


पुणे- मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूकवरून जनतेला संबोधित करताना राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली. या काळात राज्यात 144 कलम लागू राहतील हे सांगतानाच अनेक गोष्टी सुरू राहण्याबाबतही त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या या घोषणांवरुन  नेहेमीप्रमाणे सोशल मिडियावर संचारबंदीबाबत संदिग्धता असल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तर मुख्यमंत्र्यांना ट्रोल केले जात आहे.

यापूर्वीही विरोधी पक्ष भाजप आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याच्या शैलीची टिंगल उडवली आहे. मंगळवारी जाहीर केलेली संचारबंदीबाबत आता भाजपचे नेते नीलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना ट्वीट करत ट्रोल केले आहे.

नीलेश राणे यांनी ‘थ्री इडियट्स या हिंदी चित्रपटातील एक डायलॉग ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अधिक वाचा  सरळसेवा भरतीसंदर्भात पुढील आठवड्यात सकारात्मक निर्णय होईल : शरद पवार

“मुख्यमंत्र्यांना कितीही वेळा ऐका .. काहीही समजत नाही. 3 idiots मधला एक डायलॉग आठवतो .. तुम केहना कया चाहते हो?? असे ट्वीट करून नीलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना ट्रोल केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love