महाराष्ट्रात ज्या गोष्टीची सुरुवात होते त्याचा स्वीकार संपूर्ण देश करतो- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे–महाराष्ट्र (maharashtra )नेहमी दिशा दाखवणारे राज्य आहे. महाराष्ट्रात ज्या गोष्टीची सुरुवात होते त्याचा स्वीकार संपूर्ण देश करतो. म्हणून ज्या ज्या गोष्टी करता येणे शक्य असतील त्या केल्याशिवाय राहणार नाही’, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thakaray )यांनी व्यक्त केला .

पुणे येथील पर्यायी इंधन परिषद (Alternative Fuel Council) परिसंवादात ते बोलत होते. यावेळी निती आयोगाचे उपाध्यक्ष राजिव कुमार हे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. पर्यावरणाची हानी होऊ न देता जर शाश्वत विकास करायचा असेल तर आपल्याला पर्यायी इंधनांसारखे मार्ग निवडणं आवश्यक आहे’, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मार्गदर्शन करणं हा राजकारण्यांचा आवडता छंद आहे, मग त्यातली काही माहिती असो वा नसो. तिकडे एवढी तज्ज्ञमंडळी असताना मी काही मार्गदर्शन करणार नाही, पण एका गोष्टीचं मी कौतुक करेन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला अभिमान आहे पर्यावरण, उद्योग, ऊर्जा खात्यांचे सर्व मंत्री ज्यांचे हातभार या नवीन उपक्रमाला लागले आहेत त्या सर्वांना मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने धन्यवाद देतो’, असं म्हणत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केलं.

‘एक महत्त्वाची बाब म्हणजे आपण चर्चातर खूप करतो पण आज पेट्रोल, डिझेल आणि पर्यायी इंधनावर चर्चा होत आहे हे खरंच एक मोठं पाऊल आहे. चर्चा करून आपण थांबत नाही एक एक पाऊल पुढे जातो. गेली कित्येक वर्षे झाली की पेट्रोल डिझेल वापरतो. एखादी – गोष्ट शोधणं, ते वर्षानूवर्ष वापरणं, त्यानंतर त्याला पर्याय शोधणं हे साधंसूधं काम नाही. पण काही वेळाला आपण म्हणतो आपल्याला विकास पाहिजे, विकासाला गती पाहिजे प ही गती प्रगतीची आहे की अधोगतीची हे थोडं थांबून विचार करण्याची वेळ ही येते तेव्हा थांबून विचार करणं गरजेचं असतं. आज आपण बघतो आहोत की सुरुवातीच्या काळात प्रवासासाठी जनावरांचा उपयोग होत होता, नंतर वाफेची इंजिन आली, लहानपणी गाणं होतं झुकझुक आगिन गाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी पण या धुरांच्या रेषा पुढे जाऊन काळकभिन्न ठरतात याकडे आपलं लक्ष गेलं नाही. आज आपलं लक्ष गेलं, त्यानंतर इलेक्ट्रिक रेल्वे आल्या.

आताच मेट्रोचा एक टप्पाही सुरू केला. आपण चांगल्या गोष्टी फक्त घोषित करत आलो नाही तर त्या प्रत्यक्षात आणल्या. मराठी भाषा भवन असेल, मेट्रो असेल पोलिसांचा ११२  अॅप असेल, उसतोड कामगारांच्या कार्यालयाचं लोकार्पण झालं आणि आज हा कार्यक्रम आहे एक आरोग्यदायी जीवन जगावं कसं याचा भाग आहे. आपण म्हणतो पुणे तिथे काय उणे. त्या पुण्याने एक नेतृत्त्व स्वीकारलं आहे. जिथे शक्य तिथे आयोजन करणार आहोत. जनजागृती करणार आहोत आणि जनजागृती झाल्यावर नुसतं उंटावरून शेळ्या हाकणं नको आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे आपण पर्यायी इंधनावर चालणारी वाहने उपलब्ध करून देत आहोत. उद्योग चालवताना, गुंतवणूकदारांना स्पीड ब्रेकर आले तर थोडं अवघड होतं. म्हणून गुंतवणुकदारांना, उद्योजकांना त्यांच्या मार्गातील स्पीड ब्रेकर काढणं आणि त्यांचा ड्राइव्ह स्मूथ ठेवणं याच्यासाठी पावले उचलली आहेत याचं मला कौतुक आहे’, असंही ते म्हणाले.

‘राजिवजींनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षा केवळ ऐकून आम्ही बसणारे नाहीत. तुम्ही नेहमीच साथ देत आला आहात आणि देणारही आहात आणि आता विश्वास ठेवा तुम्ही महाराष्ट्राकडून ज्या अपेक्षा कराल त्यात महाराष्ट्र कधीही मागे जाणार नाही’, असे ते म्हणाले. ‘महाराष्ट्र नेहमी पुढे जाणारे राज्य आहे. जे करण्याची आवश्यकता आहे ते आम्ही करत आलो आहोत आणि यापुढेही करू. आम्ही केवळ महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा विचार करतो’, असेही ते म्हणाले.

‘दोन वर्षाच्या पॉझ मोडवरून प्ले मोडवर आलो आहोत. बंधनं हटवली आहेत. कोरोनाचा धोका गेलेला नाही. काळजी घ्यावी लागले. पण या मोकळ्या काळात या गोष्टीवर काम करणे आवश्यक आहे. कारण प्रदूषण हा देखील एक व्हायरस आहे. कारण याने अनेकांना श्वसनाचे विकार, फुफ्फुसाचे आजार जडतात. त्यातून मुक्ती असं पर्यावरण आपण जपलं पाहिजे. मध्ये एक कार्यक्रम आदित्य ठाकरेंनी केला होता. ‘शाश्वत विकास’ म्हणजे पर्यावरणाचा विकास आणि नाइलाजाने काही हानी होणार असले तर कमीत कमी हानी होऊन पर्यावरण टिकवणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात माणसाने वाहतूक करायला सुरुवात केली तेव्हा माणसाने जनावरांचा वापर केला.

त्यानंतर एकेक करून वाफेची इंजिनं आली. आगगाड्याही आल्या. आपण लहान असताना झुकूझुकू आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी हे गाणं ऐकायचो. पण याच धुरांच्या रेषा लहानपणी लांबून पाहताना मजा वाटायची तेवढ्या त्या मोठेपणी भविष्याचं काळकभिन्न चित्र रेखाटतील, याकडे आपलं लक्ष गेलं नाही. जेव्हा लक्ष गेलं तेव्हा त्या गाड्या बाद झाल्या. नंतर विजेच्या गाड्या आल्या. जसं आपण पाहिलं की आपण मेट्रोचं उद्घाटन केलं. गेल्या काही दिवसांत आपण सातत्याने महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने आपण चांगली कामं नुसती घोषित नव्हे तर त्याचं लोकार्पण केलं. आणि आज हा अत्यंत महत्त्वाचा असा कार्यक्रम पार पडत आहे. मला अभिमान आहे की पुण्याने या उपक्रमाचं नेतृत्व स्वीकारलं आहे. आता जिथे जिथे शक्य असेल तिथे अशा परिषदांचं आयोजन केलं पाहिजे. आज या चर्चासत्रात

पर्यायी इंधनांवर चालणाऱ्या वाहनांचं प्रदर्शन आणि विक्री करत आहोत. जनतेला या गोष्टींची उपलब्धता करून देणं सरकारचं काम आहे. त्या अनुषंगाने आपण हा उपक्रम राबवत आहोत. उद्योजकांना महाराष्ट्रात यावंसं वाटलं पाहिजे, गुंतवणूकदारांची गुंतवणूक सुलभ व्हावी अशी सोय आपण करायला हवी, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *