तर सरकारला सभागृहात तोंड उघडू देणार नाही – चंद्रकांत पाटील


मुंबई- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण तापलेले आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध आल्याने भाजप आक्रमक झाला आहे. आता सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आहे. त्यामुळे सरकारची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याची तयारी केली असल्याचे दिसते आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांना जाहीर आव्हान दिले आहे. सोमवारच्या आत राज्य सरकारने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, चौकशी सुरू केली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी यावर निवेदन केले नाही तर या मुद्द्यावर तोंड न उघडणाऱ्या सरकारला आम्ही पण सभागृहात तोंड उघडू देणार नाही आणि सभागृहही चालू देणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

अधिक वाचा  छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांना मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरावे लागेल -चंद्रकांत पाटील

डॉ. रोहिदास चव्हाण कुठे गायब आहेत?

दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यवतमाळमधील रोहिदास चव्हाण नामक डॉक्टरांचा देखील उल्लेख केला. “नांदेडच्या पूजा चव्हाणचा गर्भपात यवतमाळमध्ये कसा झाला? आणि गर्भपात झाल्यापासून हे डॉ. रोहिदास चव्हाण कुठे गायब आहेत?” असा सवाल चंद्राकांत पाटील यांनी केला आहे. तसेच, “पूजा चव्हाणचा मृतदेह वानवडीच्या रुग्णालयात नेला. त्या परिसरात १५० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. वानवडी पोलिसांनी या १५ दिवसांत काय केलं याचा अहवाल द्यावा. ज्या दोघांना पोलिसांनी पकडलं होतं, त्यांचं काय झालं? ऑडिओ क्लिप्सविषयी देखील प्रश्न उपस्थित होत आहेत”, असं देखील ते म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love