उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत हे मान्य.. पण..- चंद्रकांत पाटील


मुंबई- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी आणि न्यायप्रिय असल्याचे म्हटले आहे. ते या प्रकरणाचा संपूर्ण तपास करून योग्य निर्णय घेतील असे व्यक्तव्यही संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले आहे. हे स्पष्ट केरतानाच त्यांनी भाजपवर निशाण साधला संजय राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊच द्यायचे नाही हे योग्य नाही , लोकशाहीत विरोध करण्याचा अधिकार आहे मात्र अधिवेशन होऊ न देणे हे लोकशाहीविरोधी आहे असेही ते म्हणाले. त्यांच्या या व्यक्तव्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

अधिक वाचा  निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल - अजित पवार

“उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत हे मान्य आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे ते नातू आहेत. पण व्यवहारात ते दिसत नाही. भूमिका घेताना त्यांना स्वत:च्या खुर्चीची काळजी आहे. त्यामुळे संजय राऊतांना ते सत्यवादी कुठे दिसले, ते माहीत नाही.” असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, भाजपने पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याची रणनीती आखल्याने सोमवार पासून सुरू होणारे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन या मुद्द्यावरून गाजणार हे नक्की.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love