पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण:राज्य सरकारमधील मंत्र्याबरोबर संबंध असल्याच्या चर्चेने गूढ वाढले


पुणे- पुण्यातील वानवडी परिसरात रविवारी पूजा चव्हाण या 23 वर्षीय  तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. केल्यानंतर 48 तास उलटूनही याबाबत गुन्हा नोंद न झाल्याने सोशल मिडियावर याची चर्चा सुरू झाली. या युवतीचे राज्य सरकारमधील एका मंत्र्यांशी संबंध असल्याची चर्चाही सोशल मिडियावर सुरू झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना भेटून या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका तरुणीची अशाप्रकारे झालेली आत्महत्या आणि त्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संशयाचा वर्तुळ तयार झालं आहे.  पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणायला पाहिजे, हे प्रकरण पोलिसांनी दाबू नये असं म्हटलं आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. त्या तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार दिली नसल्याचे पोलीस सांगत आहेत; पण सू मोटो गुन्हा दाखल करता येत नाही का, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील तो मंत्री कोण याची चर्चा दबक्या आवजात सुरू आहे.

अधिक वाचा  मुल होत नाही म्हणून नवऱ्याने घातला दुसऱ्या लग्नाचा घाट : पत्नीची आत्महत्या

ऑडिओ क्लिप व्हायरल

पूजा चव्हाण हिच्या जवळील एका व्यक्तीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये ती व्यक्ती, साहेब ती आत्महत्या करणार आहे, तिला समजून सांगा असं सांगत असल्याचं ऐकू येत आहे. पण ती व्यक्ती नेमकी कोणासोबत बोलत आहे हे उघड झालेलं नाही.

कोण आहे पूजा चव्हाण ?

पूजा चव्हाण(वय 23 वर्षे) ही मुळची बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी काही दिवसांपूर्वी पुण्यात आली होती. ती महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत राहात होती. पुजा चव्हाणनं विदर्भातल्या एका मंत्र्यासोबतच्या प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा होती. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी ती पुण्याला जात असल्याचं तिने नातेवाईकांना सांगितलं होतं. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली. त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवलं. त्यानंतर पूजाने हे टोकाचं पाऊल का उचललं याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली. चार दिवसांनंतर देखील या आत्महत्येचं गूढ कायम असल्यानं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केलीय.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love