पुणे-पुण्यातील व्यवसायिक अविनाश भोसलेंच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) धाड टाकण्यात आली आहे. सकाळपासून छापेमारी सुरू असल्याची चर्चा आहे. पुण्यातील शिवाजी नगरमधील एबीआयएल हाऊस या अविनाश भोसलेंच्या कार्यालयामधे आलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांना सुरक्षा पुरविण्यासाठी आलेले सुरक्षा रक्क दिसुन येत आहेत. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भोसले यांची नोव्हेंबर महिन्यात मुंबईत 2 वेळा ईडीने चौकशी केली होती.
काही दिवसांपूर्वी अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील ईडीने काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी बोलावलं होतं. अविनाश भोसले हे जलसंपदा विभागातील कॉन्ट्रॅक्टस , बांधकाम, इन्फ्रा याच्याशी संबंधि आहेत आणि बांधकाम अनेक राजकीय नेत्यांनी त्यांचे जवळचे संबंध आहेत. राज्य मंत्री विश्वजीत कदम यांचे अविनाश भोसले हे सासरे आहेत.दरम्यान,सहा वर्षांपूर्वींच्या विदेशी चलन प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यात ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. तसंच आयकर विभागाकडून अविनाश भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील २३ ठिकाणांवर धाड टाकण्यात आली होती. ईडीने याप्रकरणी त्यांनाही दोन आठवड्यांपूर्वी नोटीस पाठवली असल्याचं वृत्त होतं. राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे अविनाश भोसले सासरे आहेत.