गोवा लघुपट महोत्सव:‘पेनफूल प्राईड’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट


पुणे- यंदा पुण्यामध्ये झालेल्या 7 व्या गोवा लघुपट महोत्सवात पुण्यातील लघुपट दिग्दर्शक आणि कलाकारांनी महत्त्वाची पारितोषिके जिंकून चमक दाखविली. ‘पेनफूल प्राईड’ सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला, तर महेश लिमये यांना ‘पुनरागमनायच’साठी आणि स्वप्निल कापुरे यांना ‘दोन जगातला कवी’ या लघुपटांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले.

मराठी चित्रपट परिवाराच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन कण्यात आले होते. या कार्यक्रमास जेष्ठ लेखक श्रीनिवास भणगे, सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ समीक्षक दिलीप कुकडे, जेष्ठ कॅमेरामन राम झोंड, भालचंद्र सुपेकर उपस्थित होते.

सर्वोत्कृष्ट लघुपटाचे दुसरे पारितोषिक ‘वाटय़ा’ लघुपटाला मिळाले, जर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे दुसरे पारिताषिक सुशांत पांडे यांना मिळाले. पुनीत बालन स्टुडियोजची निर्मिती असलेला ‘आशेची रोषणाई’ हा सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला. ‘लव्ह पॉईट’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट संकल्पनेचे पारितोषिक मिळाले.

अधिक वाचा  करीनाने दिला दुसऱ्या मुलाला जन्म:सोशल मिडियावर 'औरंगजेब' असे नामकरण

सर्वोत्कृष्ट प्रयोगशील लघुपटाचे पारितोषिक ‘कलावा’ लघुपटाने पटकाविले. चेन्नईतील ‘मधुरम’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट कॅमेरा, संकलन आणि पटकथेची पारितोषिके जिंकली. बेंगळूरमधील ‘एक कप चहा’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेशनपटाचा सन्मान मिळविला. तर मुदस्सर खान यांच्या लघुपटाने सर्वोत्कृष्ट सांगितिक लघुपटाचा गौरव प्राप्त केला. शुभम खैरनार यांच्या मंत्रा लघुपटाने सर्वोत्कृष्ट जाहिरातीचे, ‘मोगरा’ने फिक्शन लघुपटाचे, तर ‘ठिणगी’ने लाईव्ह ऍक्शन लघुपटाचे बक्षिस मिळविले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love