त्या स्वप्नात आहेत का? कोणाला म्हणाले चंद्रकांत पाटील असे?


पुणे :भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या कोरोना लसीचे उत्पादन पुण्यात होत असून ते पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान येत आहेत, यापेक्षा राज्य सरकारचे दुसरे यश काय असणार ? या वक्तव्यावर, त्या स्वप्नात आहेत का ? ” असा एका वाक्यात टोला लगावला.

आज पंतप्रधान नरेंद मोदी हे पुण्याच्या दय्र्यावर आहेत. त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूटला भेट देऊन लसीच्या उत्पादनासंदर्भात आढावा घेतला. तर महाविकास आघाडी सरकारचीही वर्षपूर्ती झाली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी इंदापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी या योगायोगाचा संदर्भ देत अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या कोरोना लसीचे उत्पादन पुण्यात होत असून ते पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान येत आहेत, यापेक्षा राज्य सरकारचे दुसरे यश काय असणार ? असे वक्तव्य करीत भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी “त्या स्वप्नात आहेत का ? ” असे एकाच वाक्यात उत्तर देत टोला लगावला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  हा पैसा कुणाचा? राहुल गांधी यांचा सवाल : पंतप्रधान मोदी गप्प का?