कोरोनामुक्त झाल्यानंतरही नाही सोडत कोविड पाठ : लाँग कोविडने लोक त्रस्त


नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोविड-१९ विषाणूने जगात थैमान घातलेले आहे. रोज जगात नवीन किती कोरोनाबाधित रुग्ण सापडले, किती बरे होऊन घरी गेले तर किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती आपण सर्वचजण ऐकतो आणि वाचतो आहे. सध्या कोरोनाबाधित  रुग्णांचे प्रमाणही कमी होताना दिसते आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. परंतु, हे सर्व सुरु असताना आता धक्कादायक आणखी एक माहिती समोर आली आहे. कोरोनातून बरे झालेल्या लोकांमध्ये त्यानंतरही अनेक आरोग्यविषयक समस्या आढळून येत आहे. त्यामध्ये, बरे होऊन अनेक दिवस उलटूनही बर्‍याच लोकांचे हृदय आणि फुफ्फुसे व्यवस्थित काम करत नसल्याचे आणि त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे.  त्यामुळे कोरोनामधून बरे झाल्यानंतरही अनेक रुग्णांना पूर्वीसारखे स्वस्थ व निरोगी वाटत नाहीये.  थकवा, स्नायू दुखणे, नैराश्य आणि चिंता यासारख्या समस्या त्यांच्यात दिसून येत आहे. अशा प्रकारच्या  परिस्थितीला लाँग कोविड (long covid0 असे म्हटले जात आहे.  परंतु,  आतापर्यंत, लाँग कोविडची कोणतीही निश्चित वैद्यकीय परिभाषा केली गेलेली नाही किंवा त्याची लक्षणे एकसारखी नाहीत. यासंदर्भात बरेच संशोधन आणि अभ्यास झाला आहे आणि तो पुढेही सुरु आहे.

 बर्‍याच रूग्णांमध्ये, कोरोनामधून बरे झाल्यानंतरही त्याची काही लक्षणे राहतात , जी बर्‍याच काळासाठी त्रासदायक ठरतात. दोन ते तीन महिन्यांनंतरही, बरे झालेल्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये दुष्परिणाम आणि  त्यांच्या आरोग्यासंदर्भात अनेक समस्या दिसून येत आहेत.  या परिस्थितीला लाँग कोविड असे म्हटले जात आहे. लाँग कोविडशी सामना करणाऱ्या लोकांमध्ये वेगवेगळी लक्षणे असू शकतात पण ‘थकवा’ हा एक सामान्य लक्षण आहे.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या संशोधन अभ्यासानुसार, कोरोनापासून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये कित्येक महिन्यांपर्यंत कोरोना विषाणूचा परिणाम दिसून येत आहे. लॉन्ग कोविडशी झुंज देणार्‍या सर्व लोकांना थकवा तर जाणवत आहेच  परंतु इतर लक्षणे म्हणजे श्वास घेण्यात त्रास होणे, डोकेदुखी, स्नायू आणि सांधे दुखणे, दृष्टी आणि ऐकण्याची समस्या, गंध आणि चव समजण्याची क्षमता कमी होणे आदी   समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उदासीनता आणि चिंता देखील लॉंग कोविडशी झुंजणार्‍या लोकांमध्ये दिसून येते.

अधिक वाचा  कार्ल्सबर्ग इंडियाने व्यवसायाबरोबरच जपली सामाजिक बांधिलकी

हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि यकृताचे देखील कोरोना संक्रमणानंतर नुकसान होण्याची शक्यता असते. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लाँग कोविडवरील संशोधनात असे म्हटले आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतरही लोकांमध्ये समस्या दिसून येत आहेत. त्यामध्ये फुफ्फुस आणि हृदयावरचे परिणाम सांगण्यात आले असून 64 टक्के रुग्णांना श्वास घेण्यास त्रास, 26 टक्के रुग्णांना हृदयाची समस्या, मूत्रपिंड 29% आणि यकृत समस्या 10% झाल्याचे म्हटले आहे.

अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये रोममधील एका रुग्णालयातून  घरी परत आलेल्या 143 रूग्णांवर प्रसिद्ध झालेल्या संशोधन अभ्यासानुसार, 87 टक्के लोकांमध्ये दोन महिन्यांनंतरही यापैकी  कमीतकमी एक लक्षण तरी आढळून आले आहे. जवळजवळ अर्ध्या लोकांना थकवा जाणवत आहे. हा निष्कर्ष  रूग्णालयात दाखल झालेल्या म्हणजेच कोरोनाच्या गंभीर रूग्णांच्या लक्षणांच्या अभ्यासावरून   काढण्यात आला आहे.  कोरोनाबाधित झालेले परंतु घरात स्वतंत्रपणे राहून (आयसोलेट) वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचारातून बरे होतात, अशा रुग्णांच्या बाबतीतही असेच होऊ शकते.

ब्रिटनमध्ये, ‘कोविड सिमटम्प ट्रॅकर अॅप’  वापरणार्‍या 40  लाख लोकांपैकी 12% लोकांमध्ये  30 दिवसांनंतरही काहीना काही लक्षणे आढळून आली आहेत. त्याचवेळी, या अॅपच्या माध्यमातून केलेल्या  सर्वेक्षणातून जो डेटा मिळाला आहे तो असे दर्शवितो की दोन टक्के लोकांना तीन महिन्यांनंतरही कोविडची लक्षणे होती. परंतु,  कोरोना विषाणू लाँग कोविडसाठी कसा कारणीभूत ठरत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबद्दल अनेक दावे केले जात आहेत, परंतु त्यात काही तथ्य नाही.

अधिक वाचा  सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीच्या वैद्यकीय चाचणीची (मानवी चाचणी) भारती हॉस्पिटलमध्ये सुरवात

 दरम्यान, याबाबत असा अंदाज वर्तविला जात आहे की, उपचारानंतर कोविड-१९ या विषाणूचा शरीराच्या बहुतेक भागांतून नायनाट झाला तरी शरीराच्या काही भागात तो काही प्रमाणात राहतो आणि पेशींना संक्रमित करू शकतो. कोरोनामुक्त झाल्यानंतरही संबंधित व्यक्तीची रोगप्रतिकारक यंत्रणा अगदी पहिल्यासारखी सामान्य होत नाही आणि त्या व्यक्तीला कायम आजारी असल्यासारखे वाटते असा दावा देखील केला जात आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील अवयवांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होताना आढळून येत आहे. विशेषत: फुफ्फुस आणि हृदयावर होणारे दुष्परिणाम हे दीर्घकालीन त्रासदायक ठरू शकतात.    

 लंडनच्या किग्स कॉलेजचे  प्रोफेसर टिम स्पेक्टर म्हणतात की आपल्याला बराच काळ अतिसार झाल्यास आपल्या आतड्यात व्हायरस असू शकतो. जर वास येण्याची क्षमता कमी झाली असेल तर विषाणू त्या व्यक्तीच्या शिरांमध्ये राहिलेला असू शकतो.  ब्रिटिश मेडिकल जर्नलशी संबंधित डॉक्टर आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपण कोविडपासून पूर्णपणे बरे होऊ शकत नसल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधणे हे जास्त संयुक्तिक आहे.

कोरोना साथीच्या रोगाने बरे झालेल्या रुग्णांना असे वाटत असेल की ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत,  तर हा अती आत्मविश्वास त्यांच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या संशोधन अभ्यासानुसार, कोरोनापासून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये कित्येक महिने कोरोना विषाणूचा परिणाम दिसून आला आहे. उपचारानंतरही ते पूर्णपणे बरे होऊ शकत नाहीत. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या दोन ते तीन महिन्यांनंतर त्याचा परिणाम दिसून येत आहे.

या संशोधन अभ्यासानुसार, कोरोनामधून बरे झालेल्या 64 टक्के लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्णांच्या एमआरआय रिपोर्टमध्ये असे दिसून आले आहे की 60 टक्के रुग्णांची फुफ्फुसे पूर्वीइतकी स्वस्थ नव्हती. 29 टक्के रुग्णांमध्ये किडनीसंबंधित समस्या, 26  टक्के रुग्णांमध्ये हृदयाची समस्या आणि १० टक्के रुग्णांना यकृताची समस्या होती तर बरे झाल्यानंतर 55 टक्के रुग्णांना थकवा जाणवत होता.

अधिक वाचा  कोरोनामुक्त झाल्यावर त्याने केली गळफास घेऊन आत्महत्या ..

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या रेडक्लिफ डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनचे डॉ.बैटी रमन यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाहून बरे झाल्यानंतर शरीराची तपासणी करणे आवश्यक असल्याचे आकडेवारी सांगते. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर रुग्णांना  वैद्यकीय सेवा देण्यासाठी एक मॉडेल विकसित केले पाहिजे.      भारतातील बर्‍याच राज्यांत, पोस्ट कोविड केअर सेंटर त्याच धर्तीवर चालू आहेत.

 डॉ. बैटी रमन यांच्या म्हणण्यानुसार, बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये जी विसंगती आढळून येत आहे ती थेट इंद्रियांना येणाऱ्या सुजेतून आढळून येत आहे. शरीराच्या अवयवांना गंभीर सूज येणे आणि अवयव निकामी होण्याची शक्यता यांच्यात एक संबंध आहे. सुजेमुळेच शरीराचे अवयव खराब होत आहेत. कोरोनामधून बरे झालेले अनेक रुग्ण अशा प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत.ब्रिटनच्या  नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्चने रुग्णांमध्ये होणाऱ्या लॉन्ग कोविडकडे लक्ष वेधले होते.  

 बरे झाल्यानंतरही निष्काळजीपणाने वागू नका

पोस्ट कोविडचा धोका लक्षात घेता कोणत्याही टप्प्यावर दुर्लक्ष करू नये असा सल्ला तज्ञ देत आहेत. बिहारच्या भागलपूर मेडिकल कॉलेजचे छातीरोग तज्ज्ञ डॉ. पीबी मिश्रा यांचे म्हणणे आहे की, याला एक नवीन प्रकारचा आजार समजा आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घ्या. कोरोनातून बरे झाल्यानंतर, आता तुम्हाला काहीही होणार नाही या भ्रमात राहू नका. मास्क वापरणे, हात स्वच्छ करणे, अंतर राखणे यासह    कोरोनाशी संबंधित प्रोटोकॉलची पूर्ण काळजी घ्या.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love