पुणे– पुण्याला कै. केशवराव जेधे, कै. विठ्ठलराव गाडगीळ, कै. आण्णा जोशी अशी लोकसभेत खासदारांची विशेष परंपरा आहे. हीच परंपरा मुरलीधर मोहोळ दिल्लीत येऊन नक्की जोपासतील, वाढवतील, असा विश्वास केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी राणे यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी शुभेच्छा देताना राणे बोलत होते.
या औपचारिक भेटीच्या वेळी बोलण्याची सुरूवातच राणे यांनी मोहोळ हे निवडून येणार आहेतच, अशी केली. ते म्हणाले, ‘मोहोळ हे १०० टक्के विजयी होणार आहेत. मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्यापर्यंत सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. विजयानंतर ते दिल्लीला आमच्या सोबतच असतील’. यावेळी मोहोळ यांनी आतापर्यंत आपण मतदारांपर्यंत पोचण्यासाठी काय केले याची महिती दिली. त्यानंतर राणे यांनीही काही मौलिक सूचना यावेळी केल्या.