सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाला ‘ड्रग्ज अँगल’: आत्महत्या की खून?


मुंबई—अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासामध्ये रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. समोर येणाऱ्या घटनांवरून सुशांतने आत्महत्या केली की त्याचा खून झाला हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र, दिल्लीहून मुंबईला आलेल्या ‘एम्स’च्या फॉरेन्सिक डॉक्टरांच्या टीमला सुशांत प्रकरणात 12 महत्वाचे धागेदोरे सापडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ‘एम्स’ने या प्रकरणाचा तपास हत्येच्या दृष्टिकोनातूनही केला जावा असे सीबीआयला सुचवले आहे.या प्रकरणात ‘ड्रग्ज अँगल’ देखील बाहेर येत आहे.

 सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी ‘एम्स’ने फॉरेन्सिक तज्ञांची पाच सदस्यांची वैद्यकीय टीम स्थापन केली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या शव विच्छेदन अहवालाबाबत या टीमला संशय आहे. सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची पूर्ण शहानिशा  करुन ‘एम्स’ची टीम मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी मदत करेल.

शव विच्छेदन अहवाला बरोबरच सुशांतच्या व्हिसेरा अहवालाची तपासणीही फॉरेन्सिक टीम करणार आहे. त्याचे निष्कर्ष शुक्रवारी सीबीआयला सोपवले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी सायंकाळी सुशांतचे पोस्टमॉर्टम व अन्य अहवाल एम्स टीमला देण्यात आले आहेत.

अधिक वाचा  सुशांत सिंह प्रकरणामुळे भाजपची प्रतिमा मलीन झालेली नाही

सुशांतच्या रहस्यमय मृत्यूभोवताली असलेल्या संशयास्पद पुराव्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे हत्याकांड घडल्याची शक्यताही पडताळून पाहिली जात असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ‘ड्रग्ज अँगल’

दरम्यान, या प्रकरणात चौकशी सीबीआय आता सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची चौकशी करत आहे. अहवालानुसार या प्रकरणात ‘ड्रग्ज अँगल’ देखील बाहेर येत आहे. रिया चक्रवर्ती यांच्या व्हॉट्सअॅप चॅटवर आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅप चॅटवरील केलेळे संवाद पुनर्प्राप्त करण्यात आले आहेत जे रियाने बोलल्यानंतर डिलीट केले होते. या चॅटमध्ये रियाने  गौरव आर्य, सॅम्युअल मिरांडा, जया साहा यांच्याशी संवाद केला आहे.

पहिल्या चॅटमध्ये, जर आपण हार्ड ड्रग्जबाबत बोलायचे झाल्यास मी जास्त  ड्रग्ज वापरलेले नाही असे म्हटले आहे. हा मेसेज रियाने   8 मार्च 2017 रोजी गौरव आर्याला पाठविला आहे.  गौरव हीच व्यक्ती आहे, ज्याचे वर्णन आरोपी ड्रग डीलर म्हणून केले जात आहे. यानंतर रिया गौरवला विचारते, ‘तुमच्याकडे एमडी आहे?’ एमडी अशा प्रकारचे ड्रग्ज आहे जे खूप स्ट्रॉंग असल्याचे मानले जाते.  

अधिक वाचा  #hathras .. प्रकाश आंबेडकरांनी केली ही मागणी

एका चॅटमध्ये रिया आणि जया साहा यांच्यातील संवाद आहे. ज्यामध्ये, रियाने एमडीएमए, गांजा अशा ड्रग्जचा उल्लेख केल्याचे आढळते. हे चॅट 25 नोव्हेंबर 2019 करण्यात आले आहे. ज्यामध्ये जया म्हणते ,”मी त्याला श्रुतीबरोबर को-ऑर्डिनेट  करायला सांगितले आहे. यानंतर रिया तिला धन्यवाद देते. त्यानंतर जया रियाला सांगते की, चहा, कॉफी अथवा पाण्यामध्ये ४ थेंब टाक आणि त्याला प्यायला दे. परिणाम येण्यासाठी 30-40 मिनिटे थांब”.

दुसर्या् गप्पांमध्ये सैमुएल मिरांडा आणि रिया यांच्यात संभाषण आहे, ज्यात सैमुएल म्हणतो, ‘हाय रिया, सामग्री संपली आहे.’  या गप्पा 17 एप्रिल 2020 च्या आहेत. त्यानंतर तो रियाला विचारतो, आम्ही शैविक (रियाचा भाऊ) याच्या मित्राकडून घेऊ शकतो का? पण त्याच्याकडे फक्त हॅश (hash) आणि ‘बड’ (Bud)आहे. ‘ हॅश आणि ‘बड” हे कमी स्ट्रॉंग ड्रग्ज असल्याचे मानले जातात.

अधिक वाचा  सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील पुण्यातील आरोपी सौरव महाकाळ जेरबंद

सुशांत प्रकरणात अनेक गोष्टींचा अद्याप उलगडा झालेला नाही. सोशल मीडियावर या प्रकरणात ड्रग अँगल येताच सुशांतच्या चाहत्यांनी रिया चक्रवर्ती हिच्या अटकेची मागणी केली आहे. चौकशी दरम्यान ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिच्या  कुटुंबाचा फोन आणि लॅपटॉप जप्त केले होते.  दरम्यान, रियाने तिच्या आयुष्यात कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. ती रक्त तपासणीसाठी तयार आहे, असे उत्तर रियाच्या वकिलांनी दिले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love