सोनिया गांधीच पुन्हा कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा; सहा महिन्यात पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाणार


नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कॉंग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची आजची बैठक अनेक घडामोडी घडत पार पडली. या बैठकीपूर्वीच पक्षाच्या जेष्ठ २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून ‘लेटर बॉम्ब’ टाकला होता. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, सोनिया गांधीच पुन्हा एकदा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा राहातील या निर्णयावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. सोनिया गांधी यांनी आपल्याला अध्यक्षपदामध्ये रस नसल्याचे अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, पुढील सहा महिन्यात पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाईल, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठकपार पडली. सकाळी ११ वाजता सुरु झालेली बैठक संध्याकाळी सहा पर्यंत चालली.

या बैठकीबद्दल कॉंग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य पी.एल. पुनिया म्हणाले की, सर्व सदस्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘सदस्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि पक्षाचे नेतृत्वही त्यांनीच करावे अशी विनंती त्यांना केली. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी पुढील बैठक लवकरच शक्यतो पुढच्या सहा महिन्यांत बोलावण्यात येईल. तोपर्यंत सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून राहण्याचे मान्य केले आहे. ‘

अधिक वाचा  सोनिया गांधी म्हणाल्या मला पक्षाचे नेतृत्व करण्यात रस नाही? कोण होणार काँगेसचा अध्यक्ष?

 नेतृत्त्वावरून पक्षात वाद नाही: मुनिअप्पा

कॉंग्रेसचे नेते आणि सीडब्ल्यूसी सदस्य के.एच. मुनियप्पा म्हणाले की, सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष पदावर कायम राहतील आणि कार्यकारी समितीने सर्वानुमते निर्णय घेतला आहे की लवकरात लवकर अध्यक्षपदासाठी निवडणुका घेण्यात येतील. ते म्हणाले, नेतृत्वाबाबत वेगळे मत नाही. गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक आणि आनंद शर्मा यांनीही नेतृत्वाबाबत वाद नसल्याचे लिखित दिले आहे.

आम्ही मर्यादा पाळून मुद्दे उपस्थित केलेः गुलाम नबी आझाद

या बैठकीस उपस्थित अंबिका सोनी यांनी  पक्षाच्या घटनेनुसार ज्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्ष नेतृत्वाबाबत पत्र लिहिले त्यांच्याविरोधात कारवाई केली जाऊ शकते असे म्हटले. त्यावर गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी  हा मुद्दा उपस्थित करण्याच्या मर्यादा पाळण्यात आल्याचे सांगितले. यावरही कोणाला वाटत असेल की पक्षाच्या घटनेविरुध्द काम केले आहे तर तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

अधिक वाचा  भाजपच्या संकल्प पत्रात घोर निराशेचे दर्शन – मोहन जोशी

सोनिया आणि राहुल यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास’

ज्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्ष नेतृत्वाबाबत पत्र लिहिले होते त्यांनी सीडब्ल्यूसीच्या बैठकीत म्हटले आहे की त्यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नेते म्हणाले, ‘संघटनेमध्ये काही बदल घडविण्याबाबत काही चिंता होती, त्यांना प्रकट करण्यासाठी हे पत्र लिहिले गेले होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे.

दरम्यान, बैठकीला वादाला सुरुवात झाली. सोनिया गांधी यांना पक्षाच्या नेतृत्त्वाविषयी 23 नेत्यांनी जे पत्र पाठवले होते त्याला राहुल गांधी यांनी भाजपशी मिलीभगत असल्याचे म्हटल्यानंतर या वादविवादाला सुरुवात झाली. यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी निषेध केला आणि हा आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ इथपर्यंत हा वाद गेला. त्यांनी तशी नाराजी ट्वीटद्वारे व्यक्त केली.

अधिक वाचा  #Medha Kulkarni: मेधा कुलकर्णी यांचा राजकीय वनवास संपला: भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

मात्र, नंतर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी असे काहीही बोलले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर थोड्याच वेळात सिब्बल आणि आझाद दोघांनीही आपला सूर बदलला. सुरुवातीला सिब्बल म्हणाले की, राहुल गांधींनी त्यांना सर्व काही वैयक्तिकरित्या सांगितले म्हणून ते आपले ट्विट मागे घेत आहेत. त्यानंतर काही वेळातच आझाद म्हणाले की, राहुल गांधींनी ना बैठकीत ना बाहेर भाजपा बरोबर मिलीभगत असल्याचे म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love