#Ajit Pawar : ‘पुष्पा नाम है मेरा, फुल नही फायर हुं’, काय चाललंय? – अजित पवारांनी पोलिसांना सुनावले

We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

Ajit Pawar: गुन्हेगारांचं उदात्तीकरण(Sublimation of criminals) थांबलं पाहिजे, चित्रपटांचा परिणाम जाणवत आहे. पुष्पा नाम है मेरा, फुल नही फायर हुं, (Pushpa naam hai mera, phul nahi fire hum) काय चाललंय? जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे(prisoner) बाहेर वाढदिवस(Bithday) साजरे होतात. पोलिसांची इभ्रत राहिली पाहिजे. गुन्हेगारांचे होर्डिंग (Hording) लागतात कसे? असा सवाल करत पोलिस स्टेशनमध्ये(Police Station) काम करताना कोणताही भेदभाव करू नका, सत्ताधारी पक्षाचा असो वा विरोधी पक्षाचा चुकला तर कारवाई झालीच पाहिजे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलिसांना सुनावले.

पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील पोलीस स्टेशन उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पोलिस दलात ५० टक्क्याऐवजी १०० टक्के नोकर भरती करणार असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर कॅबिनेटची मिळणार मंजुरी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  गुन्हेगारास वाचवण्याचे भाजप नेत्यांचे केविलवाणे प्रयत्न निंदनीय- गोपालदादा तिवारी

अजित पवार म्हणाले की, पुण्यात अलीकडे गुन्हेगारीच्या घटना घडल्या, कोण कुणाला गोळ्या घालतो, पण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हेगारांना पकडलं. ससूनमध्ये जे घडलं त्यात कुणाचाच मुलाहिजा बाळगणाऱ नाही, असं गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, कोणी कितीही मोठा असो, कितीही मोठ्या बापाचा असो त्याला सोडणार नाही. कुठे काही कानावर आलं आणि कोणी काही चुकलं तर देवेंद्रजी सस्पेंड करत नाहीत तर बडतर्फ करतात.

पोलिसांची इभ्रत राहिली पाहिजे. गुन्हेगारांचे होर्डिंग लागतात कसे? पोलिसिंगची पद्धत बदलली पाहिजे. पोलिसांचे गुन्हेगारीवर नियंत्रण राहिलं पाहिजे. पोलिस दलातील भरतीचे निकष बदलण्याची गरज आहे, उंचीची मर्यादा वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे ते म्हणाले.  पोलिसांच्या शरीरयष्टीवर लक्ष देण्याची गरज आहे, एक महिला पोलिस शरीराने अगदीच किरकोळ असल्याचं निदर्शनास आलं. चोराला कसं पकडणार असं तिला विचारलं तर ब्रेकिंग न्यूज झाली, असेही अजित पवार म्हणाले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love