Ayodhya’s first court case : स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग- १३ : ….. अखेर शुक्रवारचा देखील नमाज बंद झाला

Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.
Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.

Ayodhya’s first court case  : अमीर अलीचा (Amir Ali) हल्ला परतवल्यानंतर सन १८५५ पासून अयोध्या(Ayodhya) तशी शांतच होती. परंतु अयोध्येतील बाबरी ढाचा(Babri Dhacha)  हिंदू समाजाला(Hindu Society) सातत्याने अन्यायाची जाणीव करून देत होता. रामलल्ला(Ramlalla) च्या जन्मस्थानी विराजमान होऊ शकत नाही, तेथे मंदिर बांधले जाऊ शकत नाही याचे शल्य हिंदू समाजाला होते, म्हणूनच न्यायालयाच्या माध्यमातून काही करता येईल का? असा विचार काही साधू व बैरागी यांच्या मनात आला. यातूनच अयोध्येच्या संदर्भाने पहिला न्यायालयीन खटला (Ayodhya’s first court case) इ. स. १८८५ मध्ये दाखल झाला. ज्या चौथऱ्यावर मूर्ती ठेवून हिंदू समाज पूजा करीत आहे, तेथे मंदिर बांधण्याची परवानगी द्यावी अशा स्वरूपाची मागणी महंत रघुवरदास (Mahant Raghuvardas) यांनी फैजाबाद न्यायालयात(Faijabad Court) केली, परंतु न्यायालयाने अशा प्रकारची मागणी नाकारली.

अधिक वाचा  धक्कादायक: सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू

सन १८५५ पासून अयोध्या(Ayodhya) एकप्रकारे शांतच होती. या काळात अनेक राजवटी बदलल्या, तसेच परिस्थितीही बदलली. परंतु हिंदू(Hindu) आणि मुस्लिम(Muslim) यांच्यातील संघर्ष मात्र सुप्तावस्थेत होता असेच म्हणावे लागेल. कारण इ. स. १९३४ साली अयोध्येत भयंकर असा हिंदू-मुस्लिम(Hindu-Muslim) संघर्ष झाला; काही लोकांनी जबरदस्तीने रामजन्मभूमीत शिरून तेथे नमाज पढायचा प्रयत्न केला, परंतु साधू, बैरागी व हिंदू समाजाने तो प्रयत्न हाणून पाडला. जवळपास दोन महिने मुस्लिम समाजाला जन्मस्थान परिसरात पाऊल टाकायलाही मिळाले नाही. अखेर इंग्रज अधिकाऱ्यांनी समझोता घडवून आणला व आठवड्यातून एक दिवस फक्त दुपारचा नमाज अदा करण्याची मुस्लिमांना अनुमती दिली व हा झगडा मिटवला.

हिंदू समाजावर अन्याय होऊन देखील न्यायालयाकडून न्याय मिळत नव्हता. तरीही या  परिस्थितीत सातत्याने मुस्लिमांकडून वेगवेगळ्या पद्धतीने जन्मस्थानाच्या भूमीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु प्रत्येक प्रसंगामध्ये हिंदू समाजाने या प्रत्येक हल्ल्याचा प्राणपणाने प्रतिकार केला म्हणूनच प्रभू रामांचे जन्मस्थान अबाधित राहू शकले. आठवड्यातून एक दिवस नमाज पढण्याची परवानगी मिळवलेली असूनही त्या ठिकाणी कधीही नमाज पढला गेला नाही. या संघर्षाचा परिणाम एवढाच झाला, की १९३४ सालापासून त्याजागी अधूनमधून होणारा शुक्रवारचा नमाज पूर्णपणे बंद पडला. या कृतीचा अर्थ एवढाच आहे, की त्या स्थानी नमाज पढणे महत्त्वाचे नव्हते. परंतु अशा पद्धतीने नमाज पढण्याचा प्रयत्न करून हिंदू समाजाला त्रास देणे एवढाच उद्देश मुस्लिम समुदायाचा होता.

अधिक वाचा  पुणे लोकसभा निवडणुकीसाठी  जगदीश मुळीकांच्या उमेदवारीची शक्यता वाढली

डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

 मोबाईल फोन क्र. : ७५८८२१६५२६

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love