Sharad Pawar : शिवसेना (Shiv Sena) शिंदें गटाकडून (Shinde Group) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार अपात्र करावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंचे आमदार पात्र ठरवले. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशांना बगल देण्याची भूमिका घेतली गेली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात भक्कम स्थिती होण्यासाठी या निकालाचा उपयोग होईल. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) सर्वोच्च न्यायालयात जातील आणि त्यांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी व्यक्त केली. (This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court)
शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल असं अजिबात वाटत नव्हतं. त्याला अनेक कारणं आहे. सत्ताधाऱ्यांच्या लोकांनी निकाल काय लागणार याचं भाष्य आधीच केलं होतं. मुख्यमंत्र्यांनीही निकाल त्यांच्याच बाजूने लागेल असं भाष्य केलं होतं. निकाल त्यांच्या बाजूने लागेल याची त्यांना खात्री होती. ती खात्री निकालात दिसेल असं ध्वनित केलं होतं. तसाच निकाल लागला. निकाल वाचल्यावर आणि वकिलांशी चर्चा केल्यावर याबाबतची अधिक स्पष्टता येईल. हा निकाल पाहिल्यावर उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल, असा सल्ला देतानाच कोर्टातही ही केस सोयीची होईल. त्यांना तिथे न्याय मिळेल अशी खात्री या निकालाच्या निर्णयावरून दिसते, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
पक्ष संघटना महत्त्वाची
विधीमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना यावर निकाल आला आहे. यात विधानसभा अध्यक्षांनी विधीमंडळ पक्षाला महत्त्व दिलं आहे. मात्र, सुभाष देसाई विरुद्ध राज्य सरकारच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांनी पक्ष संघटना महत्त्वाची आहे, असा निर्णय दिला आहे. पक्ष उमेदवारांची निवड करतो, पक्षच उमेदवारांना लढण्यास उद्युक्त करतो. त्यांना जे निवडतात त्यांचं मत महत्त्वाचं आहे. पक्ष संघटना आणि विधीमंडळ पक्ष यात पक्ष संघटना महत्त्वाची आहे, असं सुभाष देसाईंच्या केसमध्ये निकाल देण्यात आलेला आहे, याकडेही शरद पवार यांनी लक्ष वेधलं.
सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यात व्हीप किंवा आदेश देण्याचा आदेश पक्ष संघटनेला असल्याचं म्हटलं आहे, विधीमंडळ पक्षाला नाही. त्यामुळे व्हीपची निवड उद्धव ठाकरे यांच्या संघटनेने केलेली नाही. हे या निकालपत्रात स्पष्ट केलं आहे, असंही ते म्हणाले.
सुभाष देसाईंच्या केसमध्ये न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलं होतं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिला नसता तर आम्हाला निकाल देता आला असता. ते पदावरच नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करता येत नाही, असं न्यायालयाने म्हटलं होतं. न्यायालयाचं हे भाष्य महत्त्वाचं आहे. त्यामुळे अपीलात गेल्यावर उद्धव ठाकरे यांना न्याय मिळेल असं वाटतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
व्हीप मोडला तर त्याच्या विरोधात कारवाई केली जाते. इथं व्हीप मोडला म्हणून शिंदेंच्या लोकांसंबंधी कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या गटाकडून करण्यात आली होती. मात्र, शिंदे यांचे आमदार पात्र ठरवण्यात आलेले आहेत. शिंदेंच्या गटाकडून ठाकरेंचे आमदार अपात्र करावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, अध्यक्षांनी ठाकरेंचे आमदार पात्र ठरवले. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना बगल देण्याची भूमिका घेतली गेली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी योग्य स्थिती आहे. उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जातील आणि त्यांना न्याय मिळेल, असं शरद पवार म्हणाले.