पुणे—शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही घटना घडली असून संबंधित मुलगी गर्भवती राहिल्याने ही घटना उघडकीस आली आहे. संबंधित शिक्षकाविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलोक सर (वय ४० रा. घोरपडी) असे नराधम शिकवणी चालकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी १४ वर्षीय शाळकरी मुलीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घोरपडी येथे राहणार अलोक सर (वय ४०) हा एका विद्यार्थीनीची शिकवणी घेण्यासाठी घरी जात होता. ती विद्यार्थीनी घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध तयार केले. विद्यार्थीने विरोध केल्यानंतर तिला धमकावत हा प्रकार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या लहान भावाला मारुन टाकेल, अशी धमकी दिली. यामुळे विद्यार्थीने चांगली घाबरली. तिने हा प्रकार कोणालाच सांगितला नाही. त्यानंतर तो शिक्षक नेहमीप्रमाणे शिकवण्यासाठी येत होता.
दरम्यान, विद्यार्थीनी मासिक पाळी चुकली. यामुळे तिच्या घराच्या मंडळींनी तिला डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी ती गर्भवती राहिल्याचे समजले. त्यानंतर अलोक सरांसंदर्भातील प्रकार तिने सांगितला. अखेरी मुंढवा पोलिसांत अलोक सराविरोधात तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अलोक सरांना अजून अटक केली नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत