जिविका हेल्थकेअर पुणे महानगरपालिकेकडून ऑन-ग्राउंड नियमित आणि गोवर लसीकरण भागीदार म्हणून नियुक्त


पुणे(प्रतिनिधि)-जिविका हेल्थकेअरच्या भारतातील वंचित समुदायांना सेवा देण्यासाठी समर्पित असलेल्या मोबाइल व्हॅन-आधारित लसीकरण क्लिनिक व्हॅक्सीन ऑनव्हील्सने ऑन-ग्राउंड गोवर आणि नियमित लसीकरण कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेसोबत भागीदारीची घोषणा केली. ही भागीदारी सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) आधारावर करण्यात आली असून जिविका हेल्थकेअर आणि पीएमसी एकत्रितपणे समुदायांजवळ लसीकरण बूथ उभारून मुलांचे लसीकरण करणार असून लसीकरणाची व्याप्ती वाढविणे हा त्याचा अंतिम उद्देश आहे.

मोबाइल व्हॅनचे उद्घाटन  पीएमसीचे  अतिरिक्त आयुक्त, श्री रवींद्र बिनवडे आणि  बीएमसी सॉफ्टवेअर च्या चुआला दिवाणजी यांच्या हस्ते झाले त्यावेळी पीएमसी चे डॉ. सूर्यकंद देवकर, जिविका हेल्थकेअर चे कृणाल मेहता , बीएमसी सॉफ्टवेअर चे गिरीश कायडिगुप्पी आणि जीविका हेल्थकेअर च्या संगिता मोरे उपस्थित होते

जीविका हेल्थकेअर लसीकरण युनिट तैनात करणार असून प्रत्येक युनिट लसींचे सुमारे ७०००-८००० डोस देईल. यात ५ वर्षांखालील मुलांसाठी गोवर आणि इतर नियमित लसीकरणाचा समावेश असेल. प्रत्येक मोबाईल लसीकरण युनिटमध्ये प्रोटोकॉलचा एक भाग म्हणून एक पात्र डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवा सहाय्यक कर्मचारी तसेच एईएफआयच्या (अॅडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन – लसीकरणानंतरची प्रतिकूल परिस्थिती) प्रसंगात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी एक रुग्णवाहिका सज्ज असेल. या मोहिमेत सरकार लस पुरवणार असून जीविका हेल्थकेअरचे मोबाईल लसीकरण युनिट मनपाच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहिमांचे आयोजन करून लसीकरण करणार आहे.

अधिक वाचा  गिरीष भेलके यांच्यावतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन : 940 तरुणांना नियुक्तिपत्र : 30 कंपन्यांचा सहभाग 

जीविका हेल्थकेअरचे अनोखे पीपीपी मॉडेल अनेक उपक्रमांचे गुंतागुंतीचे समन्वय घडवून आणील. यात खरेदीपासून तैनातीपर्यंत, जागरूकता ते एकत्रीकरण आणि त्यानंतर लस देण्याचा समावेश असेल. यासाठी अनेक भागधारकांची मदत घेण्यात येईल. भागधारकांमधील सहकार्यामुळे भागीदारीमुळे पारदर्शकता, सुलभता आणि समानता येईल. त्यामुळे  एकत्रितपणे सामान्य स्थितीकडे परत येण्यास मदत होईल. जीविका हेल्थकेअर,  रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल शी  भागीदारी करून एनजीओ आणि सीएसआर भागीदारांनाही एकत्र आणेल. त्यातून पुणे महानगरपालिका क्षेत्रातील बालकांचे  लसीकरण करण्यासाठी मोबाईल लसीकरण युनिट्स तैनात करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध संसाधनांसाठी निधी उभा करण्यात येईल. राज्य सरकारांशी भागीदारीच्या माध्यमातून ३ ते ६ महिन्यांच्या कालावधीत अंदाजे १०,००० मुलांचे लसीकरण करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (सामान्य) श्री. रवींद्र बिनवडे म्हणाले, “मुंबईतील उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने टास्क फोर्स सुरू करण्यासाठी तत्काळ पावले उचलली होती. यासाठी जीविका हेल्थकेअरने तातडीने मदतीचा हात पुढे केला.”

अधिक वाचा  छेडछाड करणाऱ्या तरुणाचे मयत गुंडाच्या पत्नीने गुप्तांग कापले

जिविका हेल्थकेअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिग्नेश पटेल म्हणाले, आमच्या डॉक्टरांवर केंद्रित असलेल्या  मोबाईल लसीकरण क्लिनिक सेवेतून पुण्याची सेवा करताना आम्हाला आनंद होत आहे. कोणताही संभाव्य उद्रेक पसरू नये यासाठी पुण्यातील बालकांमध्ये गोवर लसीकरणातून रोगप्रतिकारकता आणण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. आमच्या पीपीपी मॉडेलमुळे उद्योग, सरकार आणि स्वयंसेवी संस्थांमधील भागधारकांच्या सहकार्याला मदत होते. लसीकरणाचा प्रसार वाढविण्याच्या अंतिम उद्दिष्टाने तळागाळात नियमित लसीकरण सेवा उपलब्ध करून देण्यासही त्यामुळे मदत होते.“

जीविका हेल्थकेअर आणि पुणे महानगरपालिकेच्या लसीकरण मोहिमेला आपल्या बीएमसी केअर्स या सीएसआर उपक्रमाद्वारे  आधार देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलच्या सहकार्याने बीएमसी सॉफ्टवेअर इंडिया प्रा. लिमिटेड पुढे आली आहे.

अधिक वाचा  Atalparva | Kalasangam:कलासंगमातून उलगडले ‘अटल’ जीवनपैलू : विविध कलाविष्कारातून अटल बिहारी वाजपेयींना अभिनादन

जिविका हेल्थकेअरची व्हॅक्सीनऑनव्हील्स ही रुग्णालयापर्यंत पोचू न शकणाऱ्या मुलांचे लसीकरण करण्यात मदत व्हावी, यासाठी भारतामध्ये कुठेही मोबाईल युनिट्स सुरू करण्याची क्षमता आणि तयारीने सुसज्ज आहे. विविध देणगीदार भागीदारांच्या पाठिंब्याने, व्हॅक्सीन ऑनव्हील्सची १०० हून अधिक मोबाइल युनिट्स सादर करण्याची योजना असून ती भारतातील विविध शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये तैनात केली जाऊ शकतात.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love