अस्मिता कन्या सक्षमीकरण ​उपक्रमांतर्गत ३६००० मुलींना मिळणार लाभ


पुणे- घरगुती लैंगिक अत्याचार, सोशल मीडियावरील छळ, स्वसंरक्षण, स्त्रीरोगविषयक मिथकं आणि पोषण आहार यांच्या प्रशिक्षणावर भर देत रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी पुणे या संस्थेने आपल्या सीएसआर पार्टनर जीटीपीएल हॅथवे लिमिटेडसोबत प्रोजेक्ट अस्मिताच्या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ करत असल्याची घोषणा केली. रविवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी आगा खान पॅलेस जवळील हॉटेल हयात येथे आयोजित परिसंवादादरम्यान  केली. या परिसंवादाचा विषय ” मुलींचे सक्षमीकरण म्हणजे राष्ट्राचे सक्षमीकरण ” असा होता. आंतरराष्ट्रीय कन्या दिवस अर्थात ‘इंटर नॅशनल डॉटर्स डे’चे  औचित्य साधत ही घोषणा करण्यात आली.

अनेक जिल्ह्यांच्या रोटरी  क्लबशी भागीदारी करून या प्रकल्पाचे उद्दीष्ट महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध शाळा, अनाथाश्रम आणि संस्थांमधील ३६००० हून अधिक मुलींना प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनविण्याचे आहे. हा प्रकल्प रोटरी इंडियाचा कन्या सक्षमीकरण क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. ‘प्रोजेक्ट अस्मिता’च्या माध्यमातून ३६ हजारांहून अधिक मुलींचे हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्यात येणार असून, कमतरता भासल्यास त्यांना लोह पूरक आहार देण्यात येणार आहे.  प्रोजेक्ट अस्मिता मदत पुस्तिका त्यांना दिल्या जातील ज्यात मनोरंजक सचित्र माहितीसह सर्व विषयांचा थोडक्यात आणि संक्षिप्त समावेश असेल.

अधिक वाचा  वक्फ बोर्डामुळे मुस्लिमच बेघर : पुण्यातील प्रकार; 135 कुटुंबाची वाताहत

“मुलींना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रोजेक्ट अस्मिता हा मुलींना आत्मविश्वास प्रदान करण्याचा, त्यांना स्वतंत्र, निर्भय आणि धाडसी बनवण्याचा प्रयत्न आहे”, असे आर.आय.डी. ३१३१ चे जिल्हा प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांनी सांगितले.

जीटीपीएल हॅथवे लि.चे मुख्य वित्त अधिकारी अनिल बोथरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्रोजेक्ट अस्मिता उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि हा प्रकल्प समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो आणि रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी आमच्यासाठी एक परिपूर्ण भागीदार आहे.”

“आम्ही व्हिडिओतील मजकूर एका पुस्तिकेत समाविष्ट केला आहे, जो मराठी, गुजराती आणि हिंदी अशा ३ वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसिद्ध झाला आहे . या पुस्तिकेत रंजक चित्रमय सादरीकरणासह व्हिडिओची सर्व माहिती थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने देण्यात आली आहे”, असे रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडीचे अध्यक्ष वर्धमान गांधी म्हणाले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love