स्वच्छ पर्यावरणपूरक पुण्यासाठी धावले 28 हजार पुणेकर : संकल्प – पुणे शहर २०२७ पर्यंत देशातील सर्वाधिक स्वच्छ करण्याचा- जगदीश मुळीक

28 thousand Punekar ran for a clean environment friendly Pune
28 thousand Punekar ran for a clean environment friendly Pune

Pune Thon Marathon – पुढील पाच वर्षात पुणे शहराला स्वच्छ (Clean Pune) आणि पर्यावरणपूरक शहर (Eco-friendly city) बनविण्याच्या निर्धाराने 28 हजार पुणेकरांनी जगदीश मुळीक फाउंडेशनच्या (Jagdish Mulik Foundation) वतीने आयोजित केलेल्या ‘पुणे थॉन मॅरेथॉन’( Pune Thon Marathon )स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. (28 thousand Punekar ran for a clean environment friendly Pune)

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. संयोजक जगदीश मुळीक(Jagdish Mulik), प्रविण दबडगाव(Pravin Dabdgaon), अॅड. एस. के जैन, योगेश मुळीक(Yogesh Mulik ), सुनिल देवधर(Sunil Deodhar), अंकुश काकडे(Ankush Kakade), धिरज घाटे(Dhiraj Ghate),बापुसाहेब पठारे(Bapusaheb Pathare), दिप्ती चवधरी (Dipti Chavadhari), शैलेश टिळक, रंजनकुमार शर्मा, गणेश बिडकर(Ganesh Bidkar),शशिकांत बोराटे, कुणाल टिळक, गणेश घोष,रवींद्र साळेगावकर, वर्षा तापकीर, पूनीत जोशी, राहुल भंडारे, महेश पुंडे, संदिप सातव, रवि सांकला, राहुल सातव, राजू संकला यांची प्रमुख उपस्थिती होती.

अधिक वाचा  भारतातील तब्बल १२१ भाषा, बोलीभाषा आणि उपभाषा यांमध्ये सलग साडे तेरा तास १२१ गाण्यांचे सादरीकरण; अन् गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्

मुळीक म्हणाले, पुणे ही राज्याच्या सांस्कृतिक राजधानीसह क्रीडाप्रेमी आणि आपल्या आरोग्याची नेहमीच काळजी घेणाऱ्या हेल्थ काँशिअस शहर म्हणून ही ओळखले जाते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात विविध संस्थांद्वारे मॉरथॉनचे आयोजन केले जाते. यात हजारो तरुण -तरुणी, अबालवृद्ध सारेच सहभागी होत असतात. पुणे हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले शहर असल्याने येथे चहुबाजूंनी निसर्गाची मुक्त उधळण होत असते. त्यामुळे पुण्याचे वैभव टिकवण्यासाठी हरित आणि प्रदूषणमुक्त व स्वच्छ पुण्याचा संकल्प करत आपल्या पुणे शहराला जागतिक पातळीवरील शहर म्हणून ओळख मिळवून देण्याच्या निश्चयाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

पुणेकरांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयापासून स्पर्धा सुरू झाली. तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अशा विविध गटातील स्पर्धा झाल्या.

अधिक वाचा  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळ प्रथम

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

चाळीस वर्षाखालील पुरुष दहा किलोमीटर

प्रथम क्रमांक अक्षय जी

दुसरा क्रमांक रणजीत पटेल

तिसरा क्रमांक लोकेश चौधरी

चाळीस वर्षाखालील महिला दहा किलोमीटर

प्रथम क्रमांक राणी मुचंडी

दुसरा क्रमांक प्रमिली पाटील

तिसरा क्रमांक सलोनी लव्हाळे

चाळीस वर्षांवरील पुरुष दहा किलोमीटर

प्रथम क्रमांक दत्तात्रय जायभाय

दुसरा क्रमांक रमेश चिवुलकर

तिसरा क्रमांक सिद्धेश कुदळे

चाळीस वर्षांवरील महिला दहा किलोमीटर

प्रथम क्रमांक निकिता गोविल

दुसरा क्रमांक अर्शीआ खान

तिसरा क्रमांक मधुमती पै

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love