Sharad Mohol Murder Case: गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात (Sharad Mohol Murder Case) विठ्ठल शेलार(Vitthal Shelar) आणि गणेश मारणे(Ganesh Marne) हे दोन मुख्य सूत्रधार (Chief Facilitator) आहेत. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी १ महिना आधी बैठक घेतली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी (Pune Police) न्यायालयात (Court) दिली. या बैठकीत शरद मोहोळच्या(Sharad Mohol) खुनाचा कट(Conspiracy to murder) रचल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला. दरम्यान, विठ्ठल शेलार(Vitthal Shelar) व रामदास उर्फ वाघ्या नानासाहेब मारणे (Ramdas alias Vaghya Nanasaheb ) या दोघांना २० जानेवारीपर्यत पोलीस कोठडी(Police Custody) सुनावण्यात आली आहे. विठ्ठल शेलार(Vitthal ) आणि शरद मोहोळ या दोघांमध्ये मुळशी(Mulshi) तालुक्यातील वर्चस्वाचा वाद या खुनाला कारणीभूत ठरल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे. (1 month before the murder of Sharad Mohol, the meeting of the main facilitators was held)
विठ्ठल महादेव शेलार (वय-३६), रामदास उर्फ वाघ्या नानासाहेब मारणे (वय ३६, दोघेही रा. मुळाशी) यांना अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात मंगळवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर दुसरा मुख्य सूत्रधार गणेश मारणे हा फरार झाला असून पुणे पोलीस त्याच्या मागावर आहे.
मुन्ना पोळेकर (Munna Polekar) आणि त्याच्या साथीदारांनी ५ जानेवारी रोजी शरद मोहोळचा गोळ्या झाडून खून केला होता. याप्रकरणात आता पर्यंत १५ आरोपीना अटक करण्यात आली आहे. तसेच ८ ते ९ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस सहआयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, शरद मोहोळचा खून होण्यापूर्वी १ महिना आधी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांची बैठक झाली. विठ्ठल मारणेवर कलम ३०२, कलम ३०७ आणि खंडणीचे १७ गुन्हे दाखल आहेत. तसेच रामदास मारणे हा सुद्धा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यात बैठक कुठे झाली?, त्यावेळी अजून कोण कोण उपस्थित होते?, तसेच एक वाहन जप्त करायचे असल्याने आरोपींची ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. सरकारी पक्षाच्या वतीने नीलिमा इथापे – यादव, फिर्यादीच्या वतीने अॅड. गोपाळ भोसले यांनी बाजू मांडली. तर आरोपीच्या वतीने डी. एस. भोईटे आणि लोक अभिरक्षक कार्यालच्या रोहिणी लांघे यांनी बाजू मांडली.
यावेळी आरोपींचे वकील अॅड. भोईटे म्हणाले की, शेलार यांना रेकॉडवरील गुन्हेगार आहेत. या एकाच कारणासाठी अटक केली आहे. पोलिसांनी ज्या ज्या वेळी तपासासाठी बोलावलं तेव्हा ते गेले. या गुन्ह्यात मोक्का लावायचा असल्याने शेलार सारख्यांना आरोपी केलं आहे. न्यायालायने दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून दोन्ही आरोपीना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.