‘सशस्त्र दल ध्वजदिन निधी’करिता एसबीआय देणार दहा कोटी


पुणे- सशस्त्र दलांचे जवान व त्यांच्या कुटुंबाच्या सहाय्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्याकरिता ‘सशस्त्र दल ध्वजदिन निधी’करिता देशातील सर्वांत मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) पुढे सरसावली आहे. सामाजिक जबाबदारी पार पाडण्याच्या उद्देशाने एसबीआयने युद्धात कामगिरी बजावलेले, माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नी व मुलींच्या कल्याणासाठी दहा कोटी रुपये देण्याचे निश्चित केले आहे.

दरवषी सात डिसेंबर रोजी साजरा होणाऱया सशस्त्र दल ध्वजदिनाच्या निमित्ताने मुलींच्या शिक्षणाची तरतूद करण्याचे उद्देशाने या निधीचा उपयोग व्हावा, याकरिता बँकेने केंद्रीय सैनिक मंडळाशी सामंजस्य करार केला आहे. आपल्या कुटुंबावर अवलंबून असलेल्या आठ हजार 333 मुलींना एक वर्षासाठी दरमहा एक हजार रुपये पुरविण्यासाठी दहा कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. शासनाने सुरू केलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ,’ अभियानांर्तगत मुलींच्या शिक्षणाच्या राष्ट्रीय धोरणास पाठबळ देण्याची बँकेची ही भूमिका आहे.

अधिक वाचा  एक सप्टेंबर पासून देशात होणार हे बदल

याबाबत एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, सामाजिक कार्यातून हे काम केले जात असून, मुलींसाठी समान संधी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमात आम्ही सहभागी होत आहोत. आमच्या प्रयत्नातून माजी सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या जीवनात बदल घडवून आणण्यास मदत होईल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love